कोल्हापूर महानगरपालिकेचा गुरुवारी अर्थसंकल्प | पुढारी

कोल्हापूर महानगरपालिकेचा गुरुवारी अर्थसंकल्प

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवारी (दि. 23) सादर होणार आहे. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सुमारे एक हजार कोटीहून जास्त रकमेचा महसुली आणि भांडवली खर्चाचा अर्थसंकल्प असेल. घरफाळा, पाणीपट्टी वाढ नसल्याने शहरवासीयांना दिलासा मिळणार आहे. केएमटी आणि प्राथमिक शिक्षण समितीचाही अर्थसंकल्प सादर होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय पातळीवर अर्थसंकल्प तयार करण्यासाठी विभागप्रमुखांची धावपळ सुरू आहे. सर्वच विभागप्रमुखांनी कर रचना निश्चित करून त्यासंदर्भातील ठराव, प्रस्ताव प्रशासनाला सादर केले आहेत.

काही विभागांच्या वतीने शुल्कात 10 ते 15 टक्के वाढ सुचविण्यात आली आहे. उपसमितीला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर समिती प्रशासक डॉ. बलकवडे यांच्याकडे देईल.

Back to top button