कुरुंदवाड : महापुरात घर पडल्याने दोन कुटुंबांची परवड

कुरुंदवाड : महापुरात घर पडल्याने दोन कुटुंबांची परवड
कुरुंदवाड : महापुरात घर पडल्याने दोन कुटुंबांची परवड
Published on
Updated on

2019 सालच्या महापुरात घरे जमीनदोस्त झाल्याने निराश्रित झालेल्या येथील दोन कुटुंबांची शासनाने बेदखल घेतल्याने ते शासकीय मदतीविना वंचित राहिले आहेत. रात्र घालवण्यासाठी त्यांना मंदिर मशिदीचा आसरा घ्यावा लागत आहे. दरम्यान महापुरात घर पडल्याने शांताबाई तातोबा चौगुले या वृद्ध महिलेचा उघड्यावर फुटपाथवर झोपल्याने थंडीने मृत्यू झाला, तर निजाम मणेर या वृद्धाला मंदिर-मशिदीत राहून दिवस काढावे लागत आहेत. त्यामुळे त्यांचे हाल होत आहे.

येथील गोठणपूर गल्लीतील पंथ मंदिराजवळ कमल वसंत मोडीकर आणि शांताबाई तातोबा चौगुले या दोघी वृद्ध बहिणी अशिक्षित व मतिमंद स्वभावाच्या आहेत. घराची 2019 सालच्या महापुरात पडझड झाली. त्यातील शांताबाईचा उघड्यावर झोपल्याने थंडीने बळी गेला. पडझडीच्या कागदपत्रकांची पूर्तता न झाल्याने त्या मदतीपासून वंचित राहिल्या. त्यामुळे कमल ही आजही त्या पडक्या घराच्या जागेत प्लास्टीक डिजीटल फलकाचे छत करून कसेबसे आपले जीवन जगत आहेत.

कुरुंदवाड : महापुरात घर पडल्याने दोन कुटुंबांची परवड
कुरुंदवाड : महापुरात घर पडल्याने दोन कुटुंबांची परवड

नवबाग रस्त्यावरील निजाम मणेर या वृद्धाचे ही घर 2019 सालच्याच महापुरात पडले. कागद-पत्रकांची जमवाजमव करण्यास विलंब झाल्याने त्यांनाही मदतीपासून वंचित राहावे लागले. निजाम पती-पत्नी हे दोघे वृद्ध निराधार असून त्यांना अपत्य नसल्याने आणि घर पडल्याने रहायला आसरा नसल्याने निजामने आपल्या पत्नीला पाहुण्यांच्या घरी ठेवले आहे. तर तो स्वतः दफनभूमी, मस्जिद आणि गिरीश टॉकीज जवळील गणेश मंदिरात राहून दिवस काढत आहे.

कुरुंदवाड : महापुरात घर पडल्याने दोन कुटुंबांची परवड
कुरुंदवाड : महापुरात घर पडल्याने दोन कुटुंबांची परवड

गेल्या दोन वर्षांपासून मणेर हा मदत मिळेल या अपेक्षेपोटी पालिका व तहसीलदार कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. मात्र त्याला तुमचा पंचनामा येथे मिळत नाही तो गहाळ झाला आहे. त्यामुळे मदत मिळणे शक्य नाही, असे सांगून निरुत्तर केले जात आहे. जुलै महिन्यात आलेल्या महापुरात पंचनामा होऊन मदत मिळेल अशी मोडीकर आणि मणेर या दोघांना आशा होती. मात्र शासनाच्या 2019 साली पडझड झालेल्या घरांचे पंचनामे न करण्याचे आदेश असल्याने यावेळी ही निराशाच पदरी पडली. त्यामुळे मणेर आणि मोडीकर हे दोघेही मदतीपासून आणि घरापासूनही निराधार आहेत.

रहायला आसरा नसल्याने वृद्धपकाळात ते मरण यातना भोगात आहेत. शासनाने या दोन कुटुंबांची जबाबदारी घेऊन त्यांना शासनाच्या योजनेतून घरे बांधून द्यावीत आणि त्यांना एक आसरा द्यावा अशी अपेक्षा करणे गैर नाही.

कमल मोडीकर यांची कागदपत्रके वेळेत तहसीलदार कार्यालयात जमा न झाल्याने पुढील कारवाई झालेली नाही त्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.
चंद्रकांत काळगे, मंडल अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news