‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023’चा आज दिमाखदार प्रारंभ | पुढारी

‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023’चा आज दिमाखदार प्रारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर आणि परिसरातील घर खरेदीसाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांना एकाच छताखाली असंख्य घरांचे पर्याय उपलब्ध करून देणारा दै. ‘पुढारी’ ग्रुपच्या वतीने आयोजित ‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो’ शनिवार, दि. 18 मार्चपासून सुरू होत आहे. कोल्हापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांतील ग्राहकांसाठी घर, व्यापारी प्रॉपर्टीचे असंख्य पर्याय एका छताखाली उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन पश्चिम महाराष्ट्रातील बांधकाम क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण इव्हेंट मानला जातो. हे प्रदर्शन ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील घर शोधण्याची सुवर्णसंधी घेऊन आले आहे.

या भव्य बांधकामविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून क्रिडाई, कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर उपस्थित राहणार आहेत. उपाध्यक्ष चेतन वसा यांची प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. क्रिडाईचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. आयकॉन स्टील हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

घर खरेदीचे असंख्य पर्याय उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन 18, 19 आणि 20 मार्च 2023 असे तीन दिवस चालणार आहे. मधुसूदन हॉल, असेंब्ली रोड, शाहूपुरी कोल्हापूर येथे सकाळी 10 ते सायंकाळी 8 या वेळेत खुले राहणार आहे. कोल्हापूर आणि परिसरात निवासी तसेच व्यापारी (कमर्शियल) प्रॉपर्टीचे प्रवर्तक, बांधकाम व्यावसायिक, विकसक, तसेच गृह कर्ज पुरवठादार बँका आणि इतर वित्तीय संस्था तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित पुरवठादार यांचे स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने घर बुक करण्याची इच्छा असलेल्यांना एक चांगली संधी या एक्स्पोने दिली आहे.

‘पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023’मध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागातील, आपआपल्या गरजांनुसार वेगवेगळ्या आकाराच्या, निवासी आणि व्यापारी प्रॉपर्टीज उपलब्ध होणार आहेत. हा मेगा इव्हेंट म्हणजे खरेदीदारांसाठी तर एक सुुवर्णसंधीच असते. बांधकाम व्यावसायिक, विकासक, प्रवर्तक आणि खरेदीदारांच्या गरजांचा विचार करून या एक्स्पोची आखणी केली आहे.

बांधकाम क्षेत्र आणि त्याच्याशी संबंधित व्यावसायिकांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी, पुढारी प्रॉपर्टी एक्स्पो 2023 ही मोठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळेच या प्रदर्शनातील स्टॉल बुकींगला बांधकाम व्यावसायिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दरवर्षी होणार्‍या या एक्स्पोला मोठ्या संख्येने कोल्हापूरसह आजुबाजूच्या जिल्ह्यातील ग्राहक भेट देतात, त्यामुळेच आपला ब-ॅण्ड ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तसेच व्यवसाय वृद्धीची संधी म्हणून पुढारी प्रॉपर्टी एक्स्पोला बांधकाम क्षेत्रातून पसंती दिली जात आहे.

Back to top button