जुनी पेन्शन योजना : तिसऱ्या दिवशी हातकणंगले कार्यालयासमोर ‘बोंब मारो’ आंदोलन | पुढारी

जुनी पेन्शन योजना : तिसऱ्या दिवशी हातकणंगले कार्यालयासमोर 'बोंब मारो' आंदोलन

हातकणंगले (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा – सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या तिसऱ्या दिवशी अंदोलनाची तीव्रता वाढलीय. आंदोलकांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर त्यांनी “बोंब मारो ” आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करीत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा अंदोलनकर्त्यांनी ठामपणे निर्धार केला.

तिसऱ्या दिवशी सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. प्रचंड घोषणा देत आंदोलनकर्ते मोर्च्यामध्ये सामील झाले. तालुक्यातील सर्व संघटना मोर्चामध्ये सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिलासह चारशे ते पाचशे कर्मचारी उपस्थित होते. खोतवाडी हायस्कूलचे सचिन कांबळे यांनी ”एकच मिशन, जुनी पेशन” हे स्वरचित गाणे गायले. या गाण्यावर अंदोलनकर्त्यांनी ताल धरला.

सरकारी कर्मचाऱ्यांमुळे सरकारी रूग्णालये, शाळा, महाविद्यालये, पालिका, काही सरकारी विभागातील कामकाज ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहेत. शासकीय – निमशासकीय कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळाला. नेहमीच गजबलेला असणारा परिसर संपामुळे शांत तसेच कमी वर्दळ दिसून आली.
यावेळी आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय घुगरे, पर्यवेक्षक यासीन मुजावर, इन्तीयाज म्हैशाळे, रघुनाथ नांगरे, राहुल शेळके, अर्जुन पाटील, जितेंद्र म्हैशाळे, कृषी सहाय्यक तालुका अध्यक्ष शिवानंद शिरढोणे, अधिक्षक रविंद्र भोते, सुखदेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

आंदोलनामध्ये महानंदा घुगरे, आरोग्य विभाग तालुका अध्यक्ष महेश वडर, परीचर संघटना अध्यक्ष विजय गवंडी, पदवीधर संघटनेचे विशाल देसाई, बी. टी. कुंभार, विनाअनुदानीत कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्ष रत्नाकर माळी, जुनी पेन्शनचे उपाध्यक्ष दीपक गायकवाड, राजमोहन पाटील यांच्यासह तालुक्यातील शासकीय – निमशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

तहसील कार्यालयासमोर बोंब मारो अंदोलन करताना डी. एस. घुगरे, यासीन मुजावर, रघुनाथ नांगरे व इतर.

Back to top button