राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाला 48 कोटींचा निधी

राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी 48 कोटींचा निधी मंजूर
fund to Rajarshi Shahu Medical College
राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाला 48 कोटींचा निधी उपलब्ध.Pudhari File Photo
आशिष शिंदे

कोल्हापूर : शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निधीच्या उपलब्धतेेमुळे सर्व सुविधांनी परिपूर्ण होत आहे. राज्य सरकारने यासाठी भरीव असा 48 कोटी 54 लाख 21 हजार 488 रुपयांच्या निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून न्यायवैद्यकशास्त्र विभागासाठी स्वतंत्र इमारत, आवारातील काँक्रीटचे रस्ते, सुसज्ज असे पार्किंग, त्याचबरोबर टेबल टेनिस, बॅडमिंटन कोर्ट अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

fund to Rajarshi Shahu Medical College
Chandrapur News : आनंदवनात प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या

शेंडा पार्क येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या स्वतंत्र इमारतीच्या बांधकामासाठी सरकारने 14 कोटी 74 लाख 47 हजार 561 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासकीय आदेश काढले आहेत. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत रस्त्यांची झालेली स्थिती सुधारण्यासाठी येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच येथे वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 14 कोटी 63 लाख 3 हजार 927 रुपयांच्या निधी देण्यात येणार आहे.

fund to Rajarshi Shahu Medical College
भारतात शिक्षणापेक्षा लग्नात वारेमाप खर्च

मेडिकल कॉलेजच्या आवारात आता बॅडमिंटन, टेबल टेनिस व बास्केटबॉल कोर्ट उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 4 कोटी 56 लाख 53 हजार रुपयांचा निधी, तर आवारातील जमीन सपाटीकरण व सुशोभीकरणासाठीही भरघोस निधी देण्यात आला आहे. यामध्ये बागकाम व पेव्हिंग ब्लॉकचे काम होणार असून, त्यासाठी 14 कोटी 60 लाख 17 हजार रुपयांचा देण्याबाबत सरकारने शासकीय आदेश काढले आहेत.

fund to Rajarshi Shahu Medical College
दूध दरासाठी शेतकरी आक्रमक; उद्यापासून राज्यभर आंदोलन

निधीतून होणारी कामे

न्यायवैद्यकशास्त्र विभागाच्या इमारतीसाठी

14 कोटी 74 लाख 47 हजार 561

रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे व वाहनतळासाठी

14 कोटी 63 लाख 3 हजार 927

बॅडमिंटन, टेबल टेनिस

व बास्केटबॉल कोर्ट

4 कोटी 56 लाख 53 हजार

बागकाम व पेव्हिंग ब्लॉकसाठी

14 कोटी 60 लाख 17 हजार

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news