कुख्यात शस्त्र तस्कर याला पाठलाग करून पकडले | पुढारी

कुख्यात शस्त्र तस्कर याला पाठलाग करून पकडले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : मध्य प्रदेश, बिहारमधील शस्त्र तस्कर याच्याशी लागेबांधे असलेल्या चंदगड तालुक्यातील कुख्यात शस्त्र तस्कर याला एलसीबीच्या पथकाने रविवारी मध्यरात्री पुणे-बंगळूर महामार्गावर पाठलाग करून बेड्या ठोकल्या.

कुख्यात शस्त्र तस्कर याचे विकी धोंडिबा नाईक (वय 31, आमरोळी, चंदगड) असे नाव आहे. संशयिताकडून भारतीय बनावटीची दोन पिस्तूल, मॅगझिन, जिवंत काडतुसे असा दीड लाखाचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

संशयित मूळचा चंदगड येथील असला तरी अलीकडच्या काळात त्याचे बेळगाव, हुबळी, धारवाडसह बंगळूर येथे वास्तव्य असते. मुरगूड पोलिसांनी यापूर्वी त्याच्याकडून 2 पिस्तूलसह राऊंड हस्तगत केले होते. इंदौर – मध्य प्रदेश तसेच बिहारमधील आंतरराज्य शस्त्र तस्करी टोळ्यांशी त्याचे लागेबांधे असल्याची माहिती चौकशीत पुढे येत आहे, असे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सांगितले.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे विजय कारंडे, प्रदीप पोवार, किरण गावडे, कुमार पोतदार, अजय गोडबोले आदींनी महामार्गासह तावडे हॉटेल परिसरात पाठलाग केला. राऊंडने भरलेल्या पिस्तुलासह संशयिताला जेरबंद केल्याचे जाधव यांनी सांगितले. या पथकाने पंधरवड्यात पाच जणांना जेरबंद करून 6 पिस्तुले हस्तगत केल्याचेही ते म्हणाले. स्थानिक गुन्हेगार तस्करांच्या संपर्कात असावेत, असा संशयही त्यांनी व्यक्‍त केला.

Back to top button