कोल्हापूर: कागलमध्ये महागाईविरोधात राष्ट्रवादीची निषेध फेरी | पुढारी

कोल्हापूर: कागलमध्ये महागाईविरोधात राष्ट्रवादीची निषेध फेरी

कागल; पुढारी वृत्तसेवा : वीज, इंधन दरवाढ, महागाईविरोधात कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कागल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.३) निषेध फेरी काढण्यात आली.

यावेळी महिला कार्यकर्त्यांनी चौकामध्ये चूल पेटवून स्वयंपाक करून सिलेंडर दरवाढीचा निषेध केला. निषेध फेरी काढल्यानंतर वाढीव वीज बिलाची होळी करून शंखध्वनी करण्यात आला. यावेळी महावितरणच्या कार्यालयात जाऊन वीज दरवाढीबाबतचे निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपचाही निषेध करण्यात आला आणि वीजबिलांची होळी करण्यात आली. महिला कार्यकर्त्यांनी सिलेंडरच्या वाढलेल्या दराच्या निषेधार्थ चौकात चूल मांडून स्वयंपाक केला. चुलीवर भाजलेली भाकरी आणि चटणी कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आली.
यावेळी कागल शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजय चितारी, श्रीनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, प्रवीण काळबर यांच्यासह कागल शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्षा पद्मजा भालभर, माजी नगरसेविका माधुरी मोरबाळे, शहनाज अतार आदी उपस्थित होते.

हेही वाचा

कोल्हापूर : पन्हाळ्यात शॉर्ट सर्किटने घराला आग

कोल्हापूर : ‘राष्ट्रीय लाईनमन दिवस’ उद्या साजरा होणार

कोल्हापूर …अन् ‘डॉक्सी’च्या कारभार्‍यांनी गाशा गुंडाळला

Back to top button