कोल्हापूर : विषबाधा झाल्याने कणेरी मठावरील 12 गायी दगावल्या; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती | पुढारी

कोल्हापूर : विषबाधा झाल्याने कणेरी मठावरील 12 गायी दगावल्या; पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती

उजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा : अन्नातून विषबाधा झाल्याने कणेरी मठावरील सुमारे 12 हून अधिक गायींचा मृत्यू झाला आहे; तर अनेक गायी गंभीर असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थांच्या वतीने अद़ृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून सुमंगलम पंचमहाभूत हा पर्यावरण जनजागृती करणारा उत्सव सुरू आहे.

महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी अर्थात गुरुवारी दुपारी बारा वाजता अचानक मुक्त गोठ्यातील गायी मरण पावण्यास सुरुवात झाली. या उत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्याचे पशुवैद्यकीय पथक कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. या पथकाकडून गाईंवर उपचार केले. मात्र दरम्यान काही गायी मृत्युमुखी पडल्या.

गेले दोन दिवस पशुवैद्यकीय पथक गाईंवर उपचार करीत आहे. परंतु यातील किती गाई दगावल्या याबद्दल अद्याप कुणी माहिती दिलेली नाही. गुरुवार दुपारपासून फक्त गोठ्यातील गाई मरण्यास सुरुवात झाली.

आत्तापर्यंत 12 गाई दगावल्या असून विषबाधा झालेल्या गाईंवर 22 डॉक्टर, 30 कर्मचारी उपचार करीत आहेत.

वाय. ए. पठाण, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन कोल्हापूर

येथे येणारा प्रत्येकजण गाईला आई म्हणणारा आहे. दरमहा सुमारे दीड कोटी रुपये गाईंच्या खाद्यासाठी झोळी मागून खर्च केला जातो. गायीच्या मृत्यूमुळे मनाला वेदना होत आहेत.

अद़ृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

Back to top button