‘चक्काजाम’ म्हणजे स्टंटबाजी : उदय सामंत | पुढारी

‘चक्काजाम’ म्हणजे स्टंटबाजी : उदय सामंत

कोल्हापूर;  पुढारी वृत्तसेवा :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन म्हणजे स्टंटबाजी असल्याची टीका राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी कोल्हापूर विमानतळावर केली. कणेरी मठावरील पंचमहाभूत लोकोत्सवासाठी सामंत यांचे सकाळी आगमन झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सामंत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनवर टीका करत माजी खा. शेट्टी यांच्यावर हल्लाबोल केला.

सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकांचा ओघ वाढत चालला आहे. अनेक मोठमोठे लोक त्यांच्या सोबत येत आहेत.
मात्र, काही जण आम्ही त्यांच्या सोबत नाही हे दाखवण्यासाठी आंदोलन करत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी अशी आंदोलने करावी लागतात. शेट्टी यांचे चक्का जाम आंदोलन तसेच आहे, ती स्टंटबाजी आहे, अशी टीका सामंत यांनी केली.

Back to top button