कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा आमदार मुश्रीफांच्या निवासस्थानावर मोर्चा | पुढारी

कोल्हापूर : प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा आमदार मुश्रीफांच्या निवासस्थानावर मोर्चा

कागल; पुढारी वृत्तसेवा : प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आज (दि.२२) आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानावर मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात अन्यथा येत्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा यावेळी अंगणवाडी सेविकांनी दिला आहे.

अंगणवाडी सेविकांना चांगले मोबाईल द्यावे, पोषण ट्रॅकर ॲप मराठी मध्ये द्यावे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी द्यावी, इंधनाचे दर वाढल्याने मुलांना पोषण आहार देण्यासाठीच्या दरात वाढ करावी, मुलांना चांगला सकस आहार द्यावा, अंगणवाडी सेविका मदतनीस यांना निवृती वेळी मासिक मिळकतीच्या निम्मी पेन्शन मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी मोर्चा काढला होता. अंगणवाडी सेविकांनी मागण्यांसाठी अनेक वेळा मोर्चा, आंदोलन केले आहे. सरकार मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या मागणी तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा येणाऱ्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घातला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Back to top button