कोल्हापूर जिल्ह्यातील 56 हजार 372 शेतकरी ‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील 56 हजार 372 शेतकरी ‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 56,372 शेतकरी प्रोत्साहन अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. दोन याद्यांमधून जिल्ह्यातील 1 लाख 28 हजार शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदानाचे 479 कोटी रुपये मिळाले आहेत. जिल्ह्याला सुमारे 155 कोटींच्या अनुदानाची गरज आहे.

आधार प्रमाणीकरण न झालेले, नावात बदल, पत्ता बदल असलेले जिल्ह्यात पाच ते सहा हजार शेतकरी आहेत. नियमितपणे कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बँक व सहकार विभाग यांच्या वतीने एकूण 3 लाख 1 हजार 644 शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची यादी शासनाकडे पाठवली होती. यापैकी 1 लाख 86 हजार 632 शेतकरी पात्र ठरले होते. यातून आधार प्रमाणीकरणात 1 लाख 84 हजार 888 शेतकरी पात्र ठरले.

पात्र शेतकर्‍यांची पहिली यादी जाहीर झाली. त्यामध्ये जिल्ह्यातील 1 लाख 29 हजार 330 शेतकरी पात्र ठरले होते. या यादीतील 11 हजार शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण व काही मुद्द्यांच्या त्रुटी राहिलेल्या आहेत. त्यामुळे हे शेतकर्‍यांना अनुदान मिळालेले नसल्याने ते प्रतीक्षेत आहेत.

Back to top button