कोल्हापूर-मुंबई मार्गावर ‘वंदे भारत’कधी ? | पुढारी

कोल्हापूर-मुंबई मार्गावर ‘वंदे भारत’कधी ?

कोल्हापूर, अनिल देशमुख : मुंबई-सोलापूर आणि मुंबई-शिर्डी या दोन मार्गांवर आजपासून ‘वंदे भारत’ रेल्वे धावणार आहे. या दोन्ही शहरांइतकीच क्षमता आणि गरज असलेल्या कोल्हापूरसाठी ही गाडी कधी धावणार, असा सवाल आहे. कोल्हापूरच्या वाट्याला नेहमी उपेक्षाच येणार का, असाही सवाल आता केला जात आहे.

‘वंदे भारत’साठी राज्यात मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर या मार्गांची निवड करण्यात आली. या मार्गांइतकाच मुंबई-कोल्हापूर हा मार्गही महत्त्वाचा आहे. कोल्हापूरच नव्हे, तर सांगली आणि सातारा जिल्ह्यालाही याचा लाभ होणार आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यांतून सामूहिक पाठपुरावा झाला, तर कोल्हापूर-मुंबई मार्गावरही ‘वंदे भारत’ धावताना दिसेल.

कोल्हापूरला गरज का?

राज्यातील प्रमुख धार्मिक, पर्यटन, औद्योगिक, चित्रपट उद्योग केंद्र. कोल्हापूर-मुंबई मार्गावर दैनदिन प्रवास करणार्‍यांची संख्या अधिक. तुलनेने सकाळी आणि रात्री एकच रेल्वेगाडी. आठवड्यातून तीन दिवसच विमानसेवा. महालक्ष्मी एक्स्प्रेसला सर्वसाधारण कालावधीत (ऑफ सिझन) महिनाभर वेटिंग, सिझनमध्ये दोन महिन्याच्याही पुढे वेटिंग.

सोलापूरला ‘वंदे भारत’ का?

शिर्डी हे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. मोठ्या प्रमाणात राज्यभरातून तसेच देशातूनही भाविक शिर्डीला येत असतात.

कोल्हापूर का नाही?

कोल्हापूर हे राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळ आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक, जोतिबा, नृसिंहवाडीसाठी भाविक राज्य तसेच देशभरातून येतात. प्रमुख पर्यटन स्थळ, तरीही कोल्हापूरचा विचार का नाही?

शिर्डीसाठी ‘वंदे भारत’ का?  

सोलापूर हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील प्रमुख शहर. वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध अशी ओळख. या शहरातून दोन राज्यांत तसेच पुढे ये-जा होत असते.

कोल्हापूर का नाही?

कोल्हापूर हेदेखील महाराष्ट्र-कर्नाटक आणि कोकणच्या सीमेवरील प्रमुख शहर. गूळ, चप्पल, दागिने, फौंड्री उद्योगासह वस्त्रोद्योग, चांदी उद्योग आदींसाठी प्रसिद्ध. येथून कर्नाटक, तामीळनाडू, केरळ, गोवा राज्यासाठी ये-जा सुरू असते.

Back to top button