कोल्हापूर : म्हाकवे इंग्लिश स्कूलची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

म्हाकवे, पुढारी वॄतसेवा : कोल्हापूर जिल्ह्यस्तरीय इन्स्पायर ॲवार्ड विज्ञान प्रदर्शन २०२१-२२ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आले होते. त्याचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये म्हाकवे इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज म्हाकवे शाळेची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठई निवड करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी स्नेहा राजाराम गंगाधरे हिने बनविलेल्या स्मार्ट- आय कार्ड या उपकरणाची या प्रदर्शनासाठी निवड झाली. बलात्कार आणि अपहरण रोखण्यासाठी व गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपकरणाचा उपयोग होणार आहे. नोकरी करणा-या महिलांच्या सुरक्षेसाठी सदर उपकरण अतिशय महत्वाचे आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनीला गणित शिक्षक युवराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक पी. बी. भारमल आदींचे प्रोत्साहन दिले.
हेही वाचंलत का?
- Khelo India Youth Games : ‘खेलो इंडिया’त गारगोटीच्या सानिया सापळेला ‘शूटिंग’मध्ये कांस्यपदक
- Earthquak : तीन दिवसांपूर्वी ‘या’ भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तवलेला भूकंपाचा अंदाज ठरला खरा! ट्विट करत दिली होती माहिती
- Earthquak : तीन दिवसांपूर्वी ‘या’ भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तवलेला भूकंपाचा अंदाज ठरला खरा! ट्विट करत दिली होती माहिती