कोल्हापूर : ‘जग्गु ज्युलिएट’सह अजय-अतुल आज कस्तुरींच्या भेटीला | पुढारी

कोल्हापूर : ‘जग्गु ज्युलिएट’सह अजय-अतुल आज कस्तुरींच्या भेटीला

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कर्णमधूर संगीताची गोडी लावणारी अजय-अतुल या संगीतकारांची जोडी, तर दुसरीकडे सळसळत्या उत्साहाचा अखंड झरा अभिनेता अमेय वाघ आणि हृदयाला भिडणार्‍या मोहक हास्याची राणी अभिनेत्री वैदेही परशुरामी यांची जोडी सोमवारी (दि. 6 ) कोल्हापूरकरांच्या भेटीस येत आहे. निमित्त आहे दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आणि पुनित बालन स्टुडिओ आयोजित निखळ मनोरंजनाच्या ‘सेलिब्रिटी गपशप’ या कार्यक्रमाचे.

राजारामपुरी येथील डॉ. व्ही टी. पाटील स्मृतिभवनमध्ये दुपारी 3.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. आगामी मराठी चित्रपट ‘जग्गू ज्युलिएट’ या सिनेमाच्या निमित्ताने मराठमोळ्या कलाकांराशी दिलखुलास गप्पा मारता येणार आहेत. या सिनेमातून एक अनोखी आणि भन्नाट प्रेमकथा अनुभवता येणार आहे. दरम्यान, सोबतीला प्रल्हाद विक्रम प्रस्तुत ‘रॉकिंग हिटस् बिटस्’ हा हिंदी-मराठी गाण्यांच्या बहारदार कार्यक्रमाचा नजराणा उपस्थितांसाठी असणार आहे. त्यामध्ये अजय-अतुल या संगीतकार जोडीच्या अजरामर गीतांची जादुई बरसात हमखास पाहायला मिळणार आहे.

कार्यक्रमात कस्तुरी क्लब सभासदांसह त्यांच्या कुटुंबीयांनाही सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीसाठी 8805024242, , 8805007724 या मोबाईल क्रमांकांशी संपर्क साधावा.

Back to top button