तरुणांच्या डोक्यात पिळदार शरीराचे फॅड आहे. कमी कालावधीत अतिरिक्त व्यायाम करून शरीरयष्टी कमवण्याकडे अनेकांचा कल आहे. याच अतिरिक्त व्यायामाचा भार हृदया ला सोसवत नाही. नॅशन हेल्थ फॅमिली सर्व्हे 5 (NHFS5) मध्ये अतिरिक्त व्यायामामुळे महाराष्ट्रातील 17 टक्के नागरिकांना हृदया चा धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात महिन्याला 120 कोटी रुपयांची औषधे हृदयरुग्णांना लागत असल्याची माहिती कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनने दिली.
नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हेतून अतिरिक्त व्यायामामुळे धमन्यांवर ताण पडून कॅल्शियमचे ब्लॉकेज तयार होऊन सद़ृढ हृदय अकार्यक्षम झाल्याचेही सर्व्हेतून पुढे आले आहे. व्यायाम कोणताही असो, मात्र तो शास्त्रशुद्ध असायला हवा. मात्र अनेक नागरिकांकडून असे होत नाही. स्वतःच नागरिक अतिरिक्त व्यायाम करतात. सप्लिमेंटचा ओव्हर डोस घेतात. यामुळे शरीरातील एखादा अवयव कधी निकामी होतो हेही त्यांना समजून येत नाही. कालांतराने आरोग्याच्या तक्रारी जाणवू लागल्यानंतर वैद्यकीय तपासणीत नेमके काय झाले, अचानक आरोग्याच्या तक्रारी का वाढल्या अशा तक्रारी घेऊन रुग्ण रुग्णालयात दाखल होऊ लागल्यानंतर नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हेने पाच वर्षांत 25 हजार लोकांचा सर्व्हेद्वारे अभ्यास केला.
तीन गटांत हा सर्व्हे झाला. पहिला गट काहीच व्यायाम न करणारे, दुसरा गट मध्यम व्यायाम करणारे आणि तिसरा गट होता तो अतिरिक्त व्यायाम करणारे. यामध्ये पहिल्या दोन गटांपेक्षा तिसर्या गटाला अतिरिक्त व्यायामामुळे हृदयाला धोका असल्याचे स्पष्ट झाले. अतिरिक्त व्यायामामुळे धमन्यांवर ताण पडून कॅल्शियमचे ब्लॉकेज तयार झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे नागरिकांनी शास्त्रशुद्ध व्यायामावर लक्ष केंद्रित केला पहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.