कोल्हापूर जिल्हा बँकेचे पाच अधिकारी ‘ईडी’च्या ताब्यात | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँकेचे पाच अधिकारी ‘ईडी’च्या ताब्यात

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांच्यासह पाच अधिका-यांना सक्तवसूली संचालनालय (ईडी)ने ताब्यात घेतले आहे. तब्बल ३० तासांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवार, १ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (केडीसीसी) छापा टाकला होता. ईडीच्या पथकाने जिल्हा बँकेच्या शाहूपुरी येथील प्रधान कार्यालयात दाखल होत कागदपत्रांची तपासणी केली होती. आज (दि. २) ही कारवाई सुरूच ठेवण्यात आली. यानंतर आज सकाळी ईडीचे पथक जिल्हा बँकेत दाखल झाले. त्यांनी संबंधितांशी सलग चौकशी केली. यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. माने यांच्यासह पाच अधिका-यांना ताब्यात घेतले आहे.

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ११ जानेवारी रोजी ईडीने छापेमार केली होती. मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरांवर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यांवर ईडीने छापे टाकले होते. त्यानंतर ईडीने बुधवारी केडीसी बँकेवर छापा टाकला होता.

Back to top button