Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाच्या २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व सत्र परीक्षा पुढे ढकलल्या | पुढारी

Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाच्या २ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्व सत्र परीक्षा पुढे ढकलल्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवाजी विद्यापीठाच्या (जि. कोल्हापूर) दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या सर्व सत्र परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाने परिपत्रक प्रसिद्ध करून याची माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांनी आंदोलनाचा निर्णय घेतल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या पुढील तारखा २ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या संकेतस्थळावर सविस्तरपणे कळविण्यात येतील. वाचा सविस्तर बातमी. (Shivaji University Exam)

Shivaji University Exam : सर्व परीक्षा कामकाजावर बहिष्कार

परिपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समिती यांनी दिनांक ०२-०२-२०२३ पासून आंदोलनाचा निर्णय घेतलेला आहे. शिवाजी विद्यापीठाच्या ऑक्टोबर / नोव्हेंबर २०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दिनांक ०२-०२-२०२३ रोजी होऊ घातलेल्या विद्यापीठीय व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांचे कामकाजावर बहिष्कार घालण्यात आलेला आहे. या आंदोलनात विद्यापीठातील संलग्नित महाविद्यालयातील काम करणारे वर्ग २, ३ व ४ मधील शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता असल्याने विद्यापीठाने घोषित केलेल्या दिनांक ०२-०२-२०२३ रोजी होणाऱ्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा रद्द करण्यात येत आहेत. याची सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी नोंद घ्यावी. पुढील दिनांकाच्या परीक्षांबाबत दिनांक ०२-०२-२०२३ रोजी विद्यापीठ संकेतस्थळावर सविस्तरपणे कळविण्यात येईल. दिनांक ०२-०२-२०२३ रोजीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांचे वेळापत्रक यथावकाश कळविण्यात येईल.

हेही वाचा 

Back to top button