कोल्हापूर : अंबाबाई मंदिर उभारणीकामी आमदार हसन मुश्रीफ यांचे मोलाचे योगदान : संजय मंडलिक

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : मुरगुड येथील अंबाबाई मंदिराच्या उभारणीकामी आमदार हसन मुश्रीफ यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या योगदानामुळे मंदिर पूर्ण होण्यास मदत झाली. गेले अनेक वर्ष प्रलंबित असणारा अंबाबाई मंदिराचा प्रश्न मार्गी लागला लागला असून अंबाबाई मंदिराचा तीर्थक्षेत्र म्हणून विकास करण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करू, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. ते मुरगुड येथील ग्रामदैवत श्री अंबाबाई देवालय प्रासाद वास्तुशांती, प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण कार्यक्रम प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, मुरगुडच्या जिव्हाळ्याचा आणि प्रतिष्ठेचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान झाले आहे. या हेमाडपंथी मंदिराचे बांधकाम पूर्णपणे दगडी आहे. तो दगड घडवणे बसवणे याला बराच वेळ लागतो. त्यामध्ये कोरोनामुळे या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला. मंदिर पूर्ण होण्यासाठी मी खासदार झाल्यापासून निधी आणायचे काम केले. खासदार सदाशिव मंडलिक, विश्वनाथराव पाटील यांनी या मंदिराचा पाया घातला होता. मला कळस लढवण्याची संधी मिळाली. हा मला अंबाबाईचा मिळालेला आशीर्वाद आहे. मुरगुडची एकता अशीच पुढच्या काळात अबाधित राहावी. सर्वांनी मंदिर उभारणी कामे प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यामुळे कोणीही कसलीही शंका मनामध्ये घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार मुश्रीफ यावेळी म्हणाले, अंबाबाईचे मंदिर पूर्ण होण्यासाठी माझ्याकडून वेळोवेळी मदत झाली. मंदिर पूर्ण झाल्याचे समाधान मला झाले असून ज्यावेळी माझा मुरगुड दौरा असायचा त्यावेळी एकही दिवस असा नव्हता की मुरगुडचे अंबाबाईचा प्रश्न माझ्यासमोर आला नाही. मुरगूड शहराच्या विकासासाठी माझ्याकडून चांगले सहकार्य झाले असून भविष्यातील योग्य सहकार्य करून विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल, असे मुश्रीफ म्हणाले. यावेळी कोल्हापूर जिल्हा भाजपाचे अध्यक्ष समरजितराजे घाटगे, रविराज पाटील अविनाश पाटील, दिग्विजय पाटील, वीरेंद्र मंडलिक, वैशाली मंडलिक, सुहासिनी देवी पाटील, सायरा हसन मुश्रीफ,अमरीन नविद मुश्रीफ त्यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते.
हेही वाचंलत का?
- IND vs NZ 1st T20 : कुलदीप यादवमुळे चहलचा पत्ता कट? जाणून घ्या कोणाला मिळणार संधी
- Chandrashekhar Bawankule | …त्यावेळी शरद पवारांनी शकुनीमामाचे काम केले का ? : चंद्रशेखर बावनकुळे
- कोल्हापूर : मुरगूड येथे हजारो भाविकांच्या उपस्थितीत अंबाबाई मंदिराचा कलशारोहण सोहळा