कोल्‍हापूर : व्यावसायिकाच्या अपहरणातील टोळीला चेहऱ्यावर काळे मास्क घालून पोलीसांनी फिरवले | पुढारी

कोल्‍हापूर : व्यावसायिकाच्या अपहरणातील टोळीला चेहऱ्यावर काळे मास्क घालून पोलीसांनी फिरवले

पेठवडगाव (कोल्‍हापूर): पुढारी वृत्तसेवा : टोप संभापुर येथील एका हॉटेल व्यावसायिकाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी वसूल करणारा मुख्य आरोपी वैभव हांजगे याच्यासह सात साथीदारांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीस पथकाने अटक केली. यानंतर  तपासासाठी पेठवडगाव शहरात त्‍या सर्वांना फिरविण्यात आले.

दरम्यान, टोप संभापुर येथील गंधर्व रिसॉर्ट जवळ डॉ.सादिक मुल्लानी यांचे हॉटेल आहे. आर्थीक व्यवहारातून १७ जानेवारी रोजी डॉ.मुल्लानी यांचे वीस लाख खंडणी प्रकरणी अपहरण करण्यात आले होते.  डॉ. मुल्लानी यांच्या वडीलांनी अपहरण झालेनंतर एकाच्या खात्‍यावर 5 लाख जमा केले. यानंतर त्‍यांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. हॉटेल मॅनेजमेंटच्या व्यवहारातून आर्थिक व्यवहार झाल्याच्या संशयातून वैभव हांजगे याच्या विरूदृ शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारीनंतर पोलिसांनी हांजगे याला ताब्यात घेवून त्‍याची चौकशी असता व्यवहारातील पैसे वसूल करण्यासाठी अट्टल गुन्हेगारांना एकत्र करून त्‍याचे अपहरण केल्‍याची कबुली दिली. अपहरण टोळीचा म्होरक्या हांजगेसह टोळीतील सात आरोपींना अटक करून चेहऱ्यावर काळे मास्क घालून शहरात फिरवले. गावात हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

या टोळीला मोक्का लागणार ?

अपहरण हांजगे टोळीत सातजण गुन्हेगार आहेत. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.आणखी अपहरण, खंडणी,चोरी असे गंभीर दाखल झाल्याने या टोळीवर मोक्का सारखी कारवाई होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.

Back to top button