मुरगुड येथील अंबाबाई मंदिरास हसन मुश्रीफ यांची भेट | पुढारी

मुरगुड येथील अंबाबाई मंदिरास हसन मुश्रीफ यांची भेट

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा :  मुरगुड ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भुमी आहे. या शहराच्या वैभवात भर टाकणारे ग्रामदैवत अंबाबाई मंदिर पूर्णत्वाला गेले ही शहर वासियासाठी सुखद गोष्ट आहे. या मंदिरासाठी अडीच कोटीचा निधी दिला आहे. यापुढेही लागेल तितका निधी देऊ, असे आमदार हसनसाहेब मुश्रीफ म्‍हणाले.

मुरगूडचे ग्रामदैवत अंबाबाई मंदिराचे बांधकाम पूर्ण होऊन आजपासून पाच दिवस वास्तूशांती समारंभ पार पडत आहे. मुश्रीफ यांनी अंबाबाई मंदिरास भेट देऊन कामाची पहाणी केली. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. भव्य मंदिराचे झालेले देखणे काम पाहून मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त केले व वास्तूशांती सोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

यावेळी बाेलताना मुश्रीफ म्हणाले, देवावर जनतेची  श्रद्धा आहे. श्रद्धा जपण्यासाठीच कागल, गडहिंग्लज -उत्तुर विधानसभा मतदारसंघात सातशेहून अधिक मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्णत्वासाठी समस्त मुरगूडकर एकजुटीने तहानभूक विसरून राबले आहेत, याचेही कौतुक वाटते.

लोकवर्गणी आणि सरकारी निधी यातून हे मंदिर शिल्पकलेच्या कोरीव दगडी लेण्यासारखे आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या नकाशावर हे मंदिर एक सुंदर तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध होईल. या मंदिराच्या बांधकामामध्ये मंत्रीपदाच्या काळात पर्यटन विकास आणि तीर्थस्थळ विकास योजनेतून अडीच कोटीहून अधिक निधी आणू शकलो, याचे समाधान आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील , दिग्वीजय पाटील , माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके, जयसिंग भोसले, नामदेव भांदीगरे, सुधीर सावर्डेकर, जगन्नाथ पुजारी, राजू आमते, अमर देवळे, संजय मोरबाळे, शिवाजी सातवेकर, शिवाजी चौगले, संतोषकुमार वंडकर, बजरंग सोनूले, संदीप भारमल, सागर भोसले, आकाश आमते, संदेश शेणवी, अमृत भोसले, दत्तात्रय मंडलिक, दिग्विजय चव्हाण, रणजित मगदुम, अमित तोरसे, जगदीश गुरव आदी मान्यवरांसह  नागरिक माेठया प्रमाणात उपस्थित होते.

 

Back to top button