कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पाचगाव येथील योगेश्वरी कॉलनीतील गणपती मंदिर परिसरातील मैदानाजवळ दगडाने ठेचून एका तरूणाचा खून करण्यात आला आहे. पोलिसांनी दिेलल्या माहितीनुसार, ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (रा. फुलेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले.
दरम्यान, खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.