कोल्हापूर : एसटीच्या चाकाखाली सापडून महिला ठार | पुढारी

कोल्हापूर : एसटीच्या चाकाखाली सापडून महिला ठार

नूल; पुढारी वृत्तसेवा :  दवाखान्यासाठी मोटारसायकल वरून जात असताना तोल जाऊन पडल्याने एसटीच्या मागील चाकाखाली सापडून महिला जागीच ठार झाली. श्रीमती बेबीताई राजाराम पाटील (वय 55, रा. नूल, ता. गडहिंग्लज) असे या महिलेचे नाव आहे . मुगळी येथे बुधवारी दुपारी तीन वाजता हा अपघात झाला.

बेबीताई पाटील या मुलगा महेश यांच्या मोटारसायकलवरून गडहिंग्लजकडे दवाखान्यात डोळे दाखवण्यासाठी निघाल्या होत्या. मुगळी येथील धुळाज वस्तीजवळच्या कॉर्नरवर आल्यावर समोरून नूलच्या दिशेने एसटी (एमएच 20 डी 9073) आली होती. यावेळी एसटीचा धक्का लागल्याने तोल जाऊन त्या चाकाखाली पडल्या. मागील चाक त्यांच्या अंगावरून गेले. एसटीसोबतच त्या सुमारे वीस फूट फरफटत गेल्या. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने मुलगा महेश वाचला असून तो जखमी झाला आहे. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सून, नातवंडे असा परिवार आहे.

Back to top button