कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी आवळे रोड येथील शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पाणी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने हा छापा टाकला. यावेळी 27 जणांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कम, बावीस मोबाईल हँडसेट, 17 वाहने असा 10 लाख 63 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. इचलकरंजीत जुगार अड्ड्यावर छापा पडल्याने अड्डेचालक हादरले आहेत.
अड्डा मालक बाबासाहेब सिताराम पवार, (रा. शिरढोण, तालुका शिरोळ) याच्यासह विजय दसरे, मलिक पाथरवट, विजय डोईफोडे, सय्यद मोहम्मद, सय्यद साहेबलाल मुजावर, विशाल खोत, प्रवीण कटकुळे व अन्य 27 संशयितांवर इचलकरंजी येथील गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक निरीक्षक किरण भोसले आणि त्यांच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री ही कारवाई केली.