कोल्हापूर : वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर | पुढारी

कोल्हापूर : वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर

कोल्हापूर : राज्य शासनाने वीज क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा घाट घातल्याच्या निर्णयाविरोधात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत.

महावितरण खासगीकरण विरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राज्यभर अधिकारी, अभियंते व कर्मचारी 4 ते 6 जानेवारी या कालावधीत 72 तास कामबंद आंदोलन करणार आहेत. यापूर्वी राज्यात द्वारसभा व निदर्शने केली आहेत.

नागपूर विधानभवनावर मोर्चा काढून सरकारच्या धोरणाचा त्यांनी निषेध नोंदविला आहे. नागरिक व वीज ग्राहकांनी जनतेचा वीज उद्योग भांडवलदारांच्या घशात जाण्यापासून वाचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.

Back to top button