कोल्हापूर : ‘पुढारी’चा उद्या वर्धापन दिन; टाऊन हॉल गार्डनमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन | पुढारी

कोल्हापूर : ‘पुढारी’चा उद्या वर्धापन दिन; टाऊन हॉल गार्डनमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या 84 वर्षांपासून वाचकांच्या भावभावनांशी एकरूप होत, कोल्हापूर म्हणजे दैनिक ‘पुढारी’ आणि ‘पुढारी’ म्हणजेच कोल्हापूर असे अतूट नाते असलेल्या दै. ‘पुढारी’चा रविवारी (दि. 1) वर्धापन दिन साजरा होत आहे.

नि:पक्ष व निर्भीड पत्रकारितेचा मानदंड निर्माण केलेला दै. ‘पुढारी’ 84 वर्षांची वाटचाल पूर्ण करत 85 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त भाऊसिंगजी रोडवरील ऐतिहासिक टाऊन हॉल गार्डनच्या हिरवळीवर सायंकाळी 5 ते 8 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे. याकरिता तमाम जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘पुढारी’ व ‘टोमॅटो एफएम’ परिवाराने केले आहे.

जनमानसाच्या प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेत, त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहात, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अग्रभागी असलेला, कोल्हापूरकरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलेला, त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा दै. ‘पुढारी’ 1 जानेवारी 2023 रोजी 85 व्या वर्षात पदार्पण करत आहे. जगातील सर्वांत उंच रणभूमीवरील सियाचीन येथे सैन्यातील जवानांसाठी रुग्णालय उभे करून सामाजिक दायित्वाची अखंड साक्ष देणार्‍या दै. ‘पुढारी’ने वाचकांशी असलेले आपुलकीचे नाते गेली 84 वर्षे अखंडपणे जपले आहे. जनमानसाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची ही वीण अधिक घट्ट करत दै. ‘पुढारी’चा वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे.

दै. ‘पुढारी’चा वर्धापन दिनाचा सोहळा म्हणजे वाचक आणि कोल्हापूरकरांचा कौटुंबिक सोहळाच असतो. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी सर्वच संस्था, संघटना, तालीम व तरुण मंडळांच्या वतीनेही दै. ‘पुढारी’च्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या जात आहेत. दै. ‘पुढारी’ने निर्भीड पत्रकारितेचा अखंडपणे जपलेला वसा आणि त्यातून समाजासाठी दिलेले सर्वच स्तरातील योगदान याविषयी भावना व्यक्त करत वर्धापन दिनानिमित्त सोशल मीडियावरूनही दै. ‘पुढारी’वर शुभेच्छांचा वर्षावसुरू आहे.

Back to top button