कस्तुरींच्या आत्मविश्वासपूर्ण रॅम्पवॉकने उपस्थितही भारावले! | पुढारी

कस्तुरींच्या आत्मविश्वासपूर्ण रॅम्पवॉकने उपस्थितही भारावले!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भव्य रंगमंच, सौंदर्यवतींचा रॅम्पवॉक, सोबत कलर्स मराठीवरील कलाकारांची उपस्थिती अशा वातावरणात यंदाचा ‘मिसेस कस्तुरी’ स्पर्धेचा अंतिम सोहळा रंगला. सौंदर्यस्पर्धेमध्ये ‘मिसेस कस्तुरी क्वीन’चा किताब माधुरी कदम यांनी मिळवला. प्रियंका जाधव प्रथम उपविजेती तर शीतल आरडे यांनी द्वितीय उपविजेतीचा बहुमान मिळवला.

पारंपरिक नऊवारी साडी… नाकात न … तर कधी वेस्टर्न ड्रेसमध्ये विविध आभुषणांनी नटलेल्या कस्तुरींनी स्पर्धेच्या विविध टप्प्यांवर या कलाविश्वात स्वतःचे गुण, प्रतिभा, सिद्ध करत यश संपादन केले. यानिमित्ताने सौंदर्यवतींचे सादरीकरण प्रत्यक्षात पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध झाली आहे.

सौंदर्यवती स्पर्धेत अ‍ॅड. वर्षा पाटील आणि स्टिव्हन पावलस यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

कस्तुरी क्लब शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हलच्या व्यासपीठावर कस्तुरी क्लबच्या लावण्यवती अवतरल्या होत्या. महिलांना हे हक्काचे व्यासपीठ वाटते. इथे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांच्यातील आत्मविश्वास वृद्धिंगत होतो, त्यांच्यातील बिझनेस वुमनला स्वतःचा रोजगार सुरू करण्याची संधी मिळते. याचेच परिपूर्ण उदाहरण म्हणजे शॉपिंग अ‍ॅण्ड फूड फेस्टिव्हल होय. यामध्ये अनेक कस्तुरींनी स्वतः फूड स्टॉल उभारून उत्तम अर्थार्जन केले तर काहींनी मिसेस कस्तुरी स्पर्धेतून गृहिणीच्या भूमिकेतून बाहेर येत स्वतःला सिद्ध केले आहे. आयुष्यातील रहाटगाड्यामधून वेगवेगळ्या टप्प्यांवर यशस्वी ठरणार्‍या या कस्तुरींचे जिल्ह्याभरात कौतुक होत आहे. गेली 16 वर्षे कस्तुरी क्लब महिलांना विविध पातळीवर योग्य संधी उपलब्ध करून देत आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार्‍या कस्तुरी क्लबचे मनापासून आभार!
वनिता पाटील, कस्तुरी क्लब सभासद

Back to top button