जोतिबाच्या नावानं चांगभलं! | पुढारी

जोतिबाच्या नावानं चांगभलं!

जोतिबा डोंगर; पुढारी वृत्तसेवा : दख्खनचा राजा श्री जोतिबा दर्शनासाठी रविवारी भाविकांची मांदियाळी आलेली पाहावयास मिळाली. सलग सुट्ट्यांमुळे गेली दोन दिवस जोतिबा डोंगरावर हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. रविवारी पहाटेसापासूनच जोतिबा दर्शनासाठी रांग लागल्या. यातच नाताळ सुट्टीमुळे बहुतांश लोकांनी जोतिबा दर्शन घेतले.

रविवारी पहाटे चार वाजता घंटानाद होऊन मंदिरे खुली करण्यात आली .पहाटे पाच वाजता काकड आरती झाली. सकाळी आठ वाजता ‘श्रीं’च्या मूर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर ‘श्रीं’ची खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. दुपारी धुपारती सोहळा झाला.
दिवसभरात असंख्य भाविकांनी जोतिबा दर्शन घेतले.

सध्या सुरू असलेल्या कोरोना विषयीच्या चर्चेमुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून इन्चार्ज दीपक म्हेतर यांनी कर्मचार्‍यांना मास्क सक्ती केली आहे. कर्मचार्‍यांनी योग्य ती काळजी घेण्याची सूचना त्यांनी दिली.

Back to top button