कोल्हापूर : पादचारी पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर | पुढारी

कोल्हापूर : पादचारी पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : रेल्वे स्थानकाजवळील पादचारी उडाण पुलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्याकरिता नऊ दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. बुधवारपासून विस्तारीत प्लॅटफॉर्मसाठी इंटरलॉकिंग सिस्टिमसह अन्य प्रलंबित कामे सुरू करण्यात आली. हे काम सुरू असतानाच आज जीव धोक्यात घालून पादचारी ये-जा करत होते.

मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या परिसरात ये-जा करणार्‍यांसाठी रेल्वेफाटकावर पादचारी उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. त्याला मार्च 2018 मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 2017-18 साली त्याला निधीही नियोजन विभागाने दिला आहे. मात्र, तांत्रिक अडचणीत हा पूल अद्याप लटकलेला आहे. दरम्यान, प्लॅटफार्म विस्तारीकरणाचे अखेरच्या टप्प्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मात्र, पादचार्‍यांना परीख पुलाखालूनच जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागणार आहे. येत्या काही दिवसांत ही परिस्थिती येईल, अशी शक्यता आहे.

संबंधित बातम्या
Back to top button