कोल्हापूर : आजरा तालुक्यात 14 गावांत सत्तांतर; 17 गावांत सत्ता कायम | पुढारी

कोल्हापूर : आजरा तालुक्यात 14 गावांत सत्तांतर; 17 गावांत सत्ता कायम

आजरा; पुढारी वृत्तसेवा :  आजरा तालुक्यातील 31 ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यामध्ये 14 गावांत सत्तांतर झाले. 17 गावांत सत्ता कायम राखण्यात सत्ताधारी गटांना यश आले. जाहीर निकालापैकी राष्ट्रवादीला 9, शिंपी-चराटी गटाला 9, भाजपला 5, शिवसेनेला 3, स्थानिक आघाडी 4 तर काँग्रेसला 1 ठिकाणी यश मिळाले. निकालानंतर कार्यकर्त्यांनी आजरा येथे तसेच गावोगावी विजयाचा जल्लोष साजरा केला.

सकाळी आठ वाजता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी 12 वाजता उत्तूर ग्रामपंचायतीचा निकाल सर्वात शेवटी हाती आला. उत्तूर येथे महाविकास आघाडीने बाजी मारत सरपंच पदासह 14 जागी विजय मिळविला. भादवण येथे सरपंच संजय पाटील यांनी आपली सत्ता कायम राखत सरपंचपदासह 9 जागी विजय मिळविला. बहिरेवाडी येथे राष्ट्रवादीच्या भैरवनाथ ग्रामविकास आघाडीने सरपंच पदासह 7 जागा मिळविल्या. मडिलगे येथे राष्ट्रवादीच्या भावेश्वरी ग्रामविकास आघाडीने सरपंच पदासह 6 जागी यश मिळविले. वडशिवाले येथून विद्यमान सरपंच संतोष बेलवाडे व सुळेरान येथून विद्यमान सरंपच वैजंता पाटील पराभूत झाले.

विजयी उमेदवार सरंबळवाडी ः सरपंच – सुनीता कांबळे 421, बाजीराव देवलकर 131, उज्ज्वला कांबळे 147, प्रभावती उत्तूरे 111, संतोष रावण, संगीता किल्लेदार, सीमल होडगे 103, लाकूडवाडी ः सरपंच – जयश्री गिलबिले 249, मोहन देवरकर 135, रेणुका गिलबिले 131, शिवानंद पाटील 83, अंकिता मोरे 81, चंद्रकांत खंदाळे 64, वनिता मांगले 83, भादवणवाडी ः सरपंच – महादेव दिवेकर 452, आनंदा गवळी 162, सरिता कांबळे 169, वैजंता शिमणे 157, कृष्णा परीट 120, कोमल भाटले 139, सरला मांग 155, सुरेश शिमणे 154. हाजगोळी खुर्द ः सरपंच – धनंजय जाधव 198, शुभांगी होरंबळे 98, मनीषा कांबळे 98, गीता सुतार 92, लता जाधव 72, आदित्य कातकर 69, सरिता केसरकर 65, प्रशांत कोटकर 71. खानापूर ः सरपंच – कल्पना डोंगरे 398, युवराज जाधव 136, माधुरी गुरव 142, सुशीला जाधव 141, विश्वास जाधव 121, अलका चव्हाण 120. चितळे : सरपंच – रत्नप्रभा भुतूर्ले 614, अजय राणे 160, संगीता येडगे 181. वझरे : सरपंच – शांताबाई गुरव 388, शीतल कांबळे 216, भारती जाधव 233, मधुकर खोत 213, विद्या जाधव 150, शशिकांत जाधव 160, तुकाराम कुंभार 118, मंगल भालेकर 134. कोरिवडे : ः सरपंच – शिवाजी पाटील 369, अस्मिता कांबळे 150, ललिता पाटील 136, धनाजी पाटील 150, परसू चौगुले 125, रेश्मा पाटील 130, अरुणा पाटील 106, सुरेश बोरवाडकर 107. धामणे : सरपंच – पूजा कांबळे 896, सुनीता वंजारे 291, तनुजा पोवार 325, सुनील सावंत 278, रेखा तेजम 345, शोभा तावरे 301, सुनील आडावकर 304, नम—ता गुरव 340, शिवाजी गिलबिले 278, शिवाजी लोकरे 311. आर्दाळ : सरपंच – रूपाली पाटील 662, धनाजी ससाणे 167, संगीता सुतार 170, स्वप्नाली बांबरे 256, मंगल पुंडपळ 280, विठ्ठल पोवार 252, सुमन सोनार 213, विद्याधर गुरव 236. कानोली : सरपंच – सुषमा पाटील 440, सारिका भोसले 222, सुधीर पाटील 211, चंद्रकांत पाटील 145, आरती देसाई 190, शुभांगी देसाई 210, अनिल पाटील 137. सुळेरान : सरपंच शशिकांत कांबळे 394, श्रावण कांबळे 155, जयश्री पाटील 190, अनविता चौकुळकर 144. हाजगोळी ब. : सरपंच- सविता जाधव 289, राजश्री जाधव 114, अस्मिता पंडित 142, अभिजित चौगुले 137, सुगंधा जाधव 80, वासंती कांबळे बिनविरोध, उज्ज्वला येसादे 92, आनंदा गुरव 76. शृंगारवाडी : सरपंच समीर देसाई 380, पांडुरंग सावंत 195, विमल पाटील 198, अंकुश तारळेकर 139, सीमा देसाई 143. मडिलगे : सरपंच- बापू निऊंगरे 788, आनंद कांबळे 269, पांडुरंग जाधव 267, शांताबाई सुतार 286, शिवराज मोहिते 303, मनीषा कानेकर 301, शामल कातकर 236, सुशांत गुरव 263, ज्ञानेश्वरी मुरुकटे 291, कविता मांग 263. बहिरेवाडी : सरपंच- रत्नजा सावंत 1319, भाग्यश्री आयवाळे 410, सरिता जोंधळे 458, दत्ता मिसाळ 375, उल्का गोरुले 366, उषा सुतार 344, सुहास चौगुले 354, स्वाती चव्हाण 240, सुरेश खोत 264, विकास चौथे 376, मालन मोरे 365, युवराज कांबळे 300. वडकशिवाले : सरपंच – मयुरी कांबळे 423, जयवंत शिंदे 168, शिला बेलवाडे 170, शालन कांबळे 169, अमर पाटील 115, वत्सला कसलकर 116, नितीन सावंत 141, शोभा काळे 141. दाभिल : सरपंच – युवराज पाटील 634, सुधाताई कांबळे 255, माधुरी सुतार 250, श्रावण वाझे 271, पूनम गायकवाड 145, सुगंधा राणे 199, रवींद्र मुगूर्डेकर 211.

झुलपेवाडी : सरपंच – अर्चना सुतार 549, आरती पावले 229, नितीन पाडेकर 222, अस्मिता कोंडेकर 296, गीताताई भंडारी 280, नामदेव जाधव 295, संभाजी अस्वले 209, सारिका सुतार 202. पेंढारवाडी : सरपंच – सिंधुताई आजगेकर 263, उषा आजगेकर 130, विमल चव्हाण 112, संजय आजगेकर 117, अंजना आजगेकर 82, भास्कर लोहार 80, इंदुताई आजगेकर 81, सचिन आजगेकर 85, गजरगाव : सरपंच – आनंदा कांबळे 639, सविता पाटील 254, प्रकाश देसाई 226, विठ्ठल पाटील 287, कुसुम कुलकर्णी 242, ज्योती गुरव 236, भूषण भिऊंगडे 217, अनुसया कांबळे 403, महादेव पाटील 348, आक्काताई पाटील 399. किटवडे : सरपंच – लहू वाकर 493, उज्ज्वला पाटील 227, रखुमाजी पाटील 120, शीतल पाटील 125. शेळप : सरपंच – अर्जुन बागडी 259, सुधाकर पाटील 122, ऊर्मिला गुंजाळ 123, शीतल नवार 102, दत्तात्रय पाटील 90. सोहाळे : सरपंच – भारती डेळेकर 581, वसंत कोंडुसकर 209, निर्मला दोरुगडे 184, शिवाजी कोंडुसकर 177, तानाजी पोवार 169, उषा कांबळे 156. कोळिंद्रे ः सरपंच – वंदना सावंत 839, मनीषा आमृस्कर 364, दीपाली पाटील 357, नंदा जाधव 311, सदाशिव हेब्बाळकर 327, विजय कांबळे 312, संगीता बुगडे 290, भिकाजी गोंधळी 298.

मासेवाडी : सरपंच – पांडुरंग तोरगले 526, महादेव पाटील 127, भादवण : सरपंच – माधुरी गाडे 1247, निलीम देवरकर 370, शीतल केसरकर 364, संजय केसरकर 368, बाळकृष्ण सुतार 353, संगीता देसाई 343, प्रमोद घाटगे 387, अश्विनी पाटील 232, अर्जुन कुंभार 242, तानुबाई देवरकर 356, सुनंदा पाटील 327, संजय पाटील 368. साळगाव : सरपंच – धनंजय पाटील 529, अर्जुन कुंभार 150, उषा नावलकर 164, बबन भंडारी 246, स्वप्नाली केसरकर 235, पूजा पाटील 268, विजय कांबळे 187, कमल केसरकर 183.

होन्याळी : सरपंच – स्मिता पाटील 697, तानाजी गुरव 200, अश्विनी खाडे 254, संगीता देऊसकर 255, शोभा जाधव 247, युवराज बिरंबोळे 246, जयश्री जाधव 254, सचिन उंचावळे 250, अश्विनी खाडे 224, विजय मांडेकर 223. खेडे : सरपंच- संदीप देशपांडे 729, माधुरी चौगुले 248, रेखा सावंत 226, विकास जाधव 230, गिरीश देशपांडे 221, मालुताई चौगुले 216, सुनीता चव्हाण 219, राहुल कातकर 233, संतोष सावरतकर 225, प्रियांका डाफळे 260. उत्तूर : सरपंच – किरण आमणगी 2083, संभाजी कुराडे 478, सविता सावंत 343, सुशांत आमणगी 374, संजय उत्तूरकर 369, सुवर्णा नाईक 646, समीक्षा देसाई 746,भैरु कुंभार 369, अनिता घोडके 350, राजाराम खोराटे 552, आशाताई पाटील 619, सुनीता केसरकर 564, मिलिंद कोळेकर 496, सुनीता हत्तिरगे 619, संदेश रायकर 508, सविता कुरुणकर 482, लता गुरव 574.

Back to top button