चंदगडला स्थानिक आघाड्यांचा फॉर्म्युला यशस्वी | पुढारी

चंदगडला स्थानिक आघाड्यांचा फॉर्म्युला यशस्वी

चंदगड, पुढारी वृत्तसेवा : चंदगड तालुक्यातील 37 ग्रामपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत सोयीनुसार झालेल्या स्थानिक आघाड्यांचा फॉर्म्युला पुन्हा एकदा यशस्वी झाल्याचे चित्र निकालानंतर स्पष्ट झाले. येथील तहसील कार्यालयात मंगळवारीसकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. प्रथमतः हेरे, अडकूर व टप्प्याटप्प्याने इतर ग्रामपंचायतींचा निकाल घोषित करण्यात आला. तहसीलदार विनोद रणवरे, नायब तहसीलदार हेमंत कामत यांनी निकाल घोषित केला. निकाल जसजसा जाहीर होईल तसा आवारात प्रचंड जल्लोष होत होता.

37 ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांना यश आले. आमदार राजेश पाटील गट, माजी मंत्री भरमुअण्णा पाटील गट, शिवाजीराव पाटील गट, गोपाळराव पाटील गट, कुपेकर गट, शिवसेना असे अस्तित्वात असलेले गट, काही ठिकाणी युती, तर कुठे विरोधक म्हणून लढले. तालुक्यात कुठेही काँग्रेस किंवा राष्ट्रवादी पक्षाच्या लेबलवर निवडणुका झाल्या नाहीत, त्यामुळे चंदगडच्या राजकारणाची खिचडी झाल्याचा प्रत्यय आला. सत्ता संपुष्टात आणण्यासाठी एका गटाविरुद्ध अनेक गट एकत्र आल्याने अनेक दिग्गज पराभूत, तर अनेक ठिकाणी सत्तांतर झाले त्यामुळेच संमिश्र आघाड्यांचे वर्चस्व राहिले.

डुक्करवाडी येथे निवडणूक बिनविरोध होणार होती. मात्र, त्याला विरोध करणार्‍यांचा धुव्वा उडाला. शिवस्मारक ग्रामविकास आघाडीने एकतर्फी विजय मिळवला. शिनोळी येथे शिवसेना-एकनाथ शिंदे गटाचा पराभव झाला. ग्रामविकास आघाडीने परिवर्तन घडवून आणले. जंगमहट्टी येथे सत्तांतर झाले. कुदनूर येथे आमदार गटाने गट शाबूत राखला. मात्र, भाजपच्या सरपंचपदाच्या उमेदवार संगीता घाटगे विजयी झाल्या.

सत्तांतर, परिवर्तन, स्थानिक आघाड्यांचे वर्चस्व

हेरे, खालसा कोळिंद्रे, आसगाव, अडकूर, येथे सत्ताधारी गटाने आपले वर्चस्व कायम राखले, तर काजिर्णे, गवसे, सरोळी, मजरे शिरगाव, कोरज, नागनवाडी, खालसा म्हाळुंगे, कोणेवाडी, कडलगे बुद्रुक, कुदनूर, हल्लारवाडी, सातवणे, निट्टूर, शिनोळी बुद्रुक, अलबादेवी, तडशीनहाळ, जंगमहट्टी, जेलुगडे, विंझणे या ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन झाले. तसेच 40 पैकी 19 ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांनी यश मिळवले. यामध्ये नागरदळे, ढेकोळी, करंजगाव, कागणी, डुक्करवाडी, लकीकटे, तेऊरवाडी, सातवणे व पार्ले या गावांचा समावेश आहे.

तीन ठिकाणी एकच उमेदवार

कोलिक येथे दर्शना गावडे या वार्ड क्र.दोन मध्ये सदस्यआणि सरपंचपदासाठी उभ्या होत्या. मात्र, त्या सदस्य व सरपंचपदावर अपयशी ठरल्या. तिसर्‍या प्रभागातून सदस्य म्हणून विजयी झाल्या. म्हाळुंगे खालसा येथे मनीषा एडगे यांचा एक मताने पराभव झाला, तर 1 मताने खरवत विजयी झाल्या.

कुदनूर ग्रामपंचायत सरपंच संगीता घाटगे 1268 मतांनी विजयी

कागणी सरपंचपद रिक्त व एक उमेदवार सदस्यपद रिक्त राहून निवडणूक लागलेल्या आठ जागांपैकी एका पार्टीचे चार व दुसर्‍या पार्टीचे तीन सदस्य निवडून आले आहेत. एका पदासाठी नोटाला अधिक मते पडली. त्यामुळे पेच प्रसंग निर्माण झाला आहे. या ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे.

गावनिहाय विजयी उमेदवार व सरपंच -ढेकोळी : सरपंच – ज्ञानेश्वर नाईक, बसवंत अडकूरकर, वंदना पाटील, समीक्षा बोंद्रे, परशराम शिंदे, विना बेनके, दुर्गाप्पा पाटील, गायत्री गायकवाड. हल्लारवाडी : सरपंच – सुभान्ना गावडे, यल्लाप्पा सदावर, धनश्री सदावर, सुजाता सदावर, परशराम भिकले, सुजाता गावडे, शिवाजी भुजबळ, धनश्री पाटील. कडलगे बुद्रुक : सरपंच – परशराम पाटील, सुशांत कांबळे, कमल कांबळे, दीपा पाटील, तुकाराम पाटील, सुधा कांबळे, विद्या रेडेकर, धोंडिबा कांबळे, ज्ञानेश्वर पाटील, वैशाली गिरीबुवा. हिंडगाव ः सरपंच – अमित चिटणीस, अर्जुन फाटक, दीपा कांबळे, सुनीता फाटक, राजेंद्र फाटक, रेश्मा बोंगाळे, रामू मस्कर, गंगूबाई खोराटे.

नागणवाडी ः सरपंच – शीतल बांदिवडेकर, चंपाबाई मोटगी, सुभाष गावडे, चंद्रशेखर गावडे, रेखा गावडे, संतोष गावडे, शुभांगी गावडे व उत्तम गावडे. करजंगाव : सरपंच – अनिता गावडे, धोंडिबा शिट्ट्याळकर, सोनम गावडे, अर्चना गावडे, सदानंद गुरव, कमल सावंत, शरद गावडे, प्रियांका कांबळे. गवसे : सरपंच – पूनम नाईक, सलीम फकीर, कोमल गावडे, रजंना इलगे, भरमू पाटील, रजंना कांबळे, वंदना नाईक, अल्लाबक्ष सय्यद, अशोक पेडणेकर, सुनीता नेवगे. हेरे : सरपंच – जयश्री गावडे, पांडुरंग कांबळे, सूरज जांबरेकर, मणाल सावंत, संतोष भिसे, प्रमिला चंदगडकर, वेदिका वंजारे, विशाल बल्लाळ, संगीता चव्हाण, तोफेरा नदाफ. सरोळी : सरपंच – विठाबाई उसणकर, सातेरी जाधव, वनिता मांडेकर, सविता पाटील, अनिता निवगिरे, महेश पाटील, तुळसा पाटील व नारायण निवगिरे. शिरगाव-सावर्डे : सरपंच – प्रकाश सुतार, सारिका आदकरी, सुनीता कुंदेकर, मोहन कुंदेकर, अंजली गावडे, दीपांजली गावडे, विलास वाके, मंगल वाके, आकाश कांबळे, भैरू गावडे. कोरज : सरपंच – अनंत कांबळे, मधुकर सांळुखे, पूजा नेवगे, शांताराम कांबळे, नितीन देवळी, गीता चांदेकर, अनिल चांदेकर, प्राजक्ता गावडे, मानसी चांदेकर व प्रांजली चांदेकर, नागरदळे : सरपंच – मंगल पाटील, एकनाथ पाटील, मंगल पाटील, शीतल पाटील, पुंडलिक पाटील, कविता मणगुतकर, यल्लूबाई हदगल, पांडुरंग सुतार, राजकुमार पाटील व अनुसया पाटील. म्हाळुंगे खालसा : सरपंच – जनाबाई खरवत, तुकाराम पाटील, पुष्पा गावडे, अनुराधा दळवी, सरिता गावडे, कल्लाप्पा गावडे, चिमाताई थडगे व गंगाराम येडगे.

कोलिक : सरपंच – आशा गावडे, कृष्णा गावडे, दर्शना गावडे, रूपाली गावडे, अनंत गावडे, शोभा गावडे, गोविंद गावडे, अनिता गावडे. कोनेवाडी : सरपंच – सीमा धुमाळे, परशराम गावडे, वर्षा चव्हाण, वर्षा गावडे, आनंद शिंदे, नर्मदा धुमाळे, सदानंद गावडे, जयश्री गावडे. खालसा कोळिंद्रे : सरपंच – सोनाली कुंभार, पांडुरंग पाटील, सुवर्णा जेलुगडेकर, सुनीता पाटील, भिकाजी पाटील, लता देसाई, सचिन देसाई. काजिर्णे : सरपंच – विठोबा सतुराम गावडे, विजय पारधी, पूजा गावडे अनिता फाटक, पांडुरंग कानूरकर, आंबुबाई यादव, खेमाण्णा पाटील, दीपाली पाटील. आसगोळी : सरपंच – शंकर कोरगावकर, अतुल कडूकर, सूर्यकांत निंबाळकर, प्रगती निंबाळकर, वसंत देसाई, सरीता वाईंगडे, तानाजी कडूकर. सातवणे बिनविरोध : सरपंच – विठ्ठल कांबळे, बाबू रेडेकर, अर्चना गुरव, गीता वांद्रे, सीताराम कांबळे, संजय रेडेकर, सुलभा आंबेकर, सुशीला गावडे, संजना माने. केंचेवाडी : सरपंच – कतिका बागडी, नामदेव कुट्रे, कलावती भोंगाळे, गावडू पाटील, आनंदी पाटील, लक्ष्मण पाटील, सुजाता कुट्रे, लता पाटील. कुदनूर : सरपंच – संगीता घाटगे, सचिन पवार, भारती आंबेवाडकर, अशोक वडर, केदारी कसलकर, सुजाता कांबळे, वनिता हेब्बाळकर, बाळव्वा गस्ती, मारुती आंबेवाडकर, साधना गुंडकल व बाबाजान कालकुंद्रीकर व सुनीता मोहनगेकर. निट्टूर : सरपंच गुलाब पाटील, वसंत पाटील, ललिता कांबळे, पूजा पाटील, भारत पाटील, चंद्रभागा नाईक, सुषमा पाटील, दिनकर पाटील, दीपक पाटील, संगीता पाटील. कोकरे – अडुरे : सरपंच – जोतिबा किरमठे, चंद्रकांत चौगुले, शांता नेसरकर, आवंतिका दळवी, ज्ञानेश्वरी धुरी, नंदा किरमठे, हणमंत यळवटकर व प्राची कांबळे, अडकूर : सरपंच – सचिन लक्ष्मण गुरव, सागर इंगवले, प्रतीक्षा कांबळे, उज्ज्वला देसाई, कल्लाप्पा चिंचणीकर, शिवराज देसाई, दीपा भेकणे, अशोक जाधव, रंजना कबाडे, अभिजित देसाई, सुषमा कोट, सुलोचना घोळसे.

कागणी : सरपंच – रिक्त, शुभांगी देसाई, सुहास बामणे, शीतल कोरे, जनार्दन देसाई, चंद्रसेन देसाई, जयश्री कांबळे, मंगल सुळेभावकर व रामचंद्र देसाई. खालसा गुडवळे : सरपंच – धुळू फोंडे, प्रकाश नरगुंदकर, रेश्मा गावडे, अर्चना गावडे, संतोष कांबळे, तन्वी धुरी, मंगेश भोवर, सुजाता मोरे. राजगोळी खुर्द : सरपंच – सुनंदा कडोलकर, अशोक नाईक, परशराम ढवळे, शोभा मोरे, कल्लाप्पा कोळिंद्रे, कावेरी कुंभार, लक्ष्मी अंगडी, पांडुरंग कांबळे, नफिसा मंगसुळी, आप्पय्या बेळ्ळी, जयश्री कांबळे, कल्लापा पाटील. अलबादेवी : सरपंच – लक्ष्मी घोळसे, मारुती कुडाळकर, समीक्षा इंगवले, अर्चना कोले, विकास डांगे, लता घोळसे, राजाराम पाटील, गीता दोरूगडे. तडशिनहाळ : सरपंच – पुंडलिक बोलके, मारुती पाटील, रूपाली कदम, इंदुबाई दरेकर, विलास इनामदार, अभिलाषा कांबळे, संजय करडे, जोसेफ फर्नांडिस. शिनोळी बुद्रुक ः सरपंच – गणपती कांबळे, नितीन पाटील, निकिता गुडेकर, स्मिता बोकमूरकर, पुंडलिक गवसेकर, चंद्रिका डागेकर, परशराम कांबळे, रामकृष्ण सुतार, बबिता तानगावडे. जंगमहट्टी : सरपंच – रेणुका कांबळे, सटुप्पा सांळुखे, शाहू भोसले, सुजाता पाटील, जोतिबा भोसले, सरिता कांबळे, वैशाली वरपे, परशुराम गावडे, सखूबाई शेळके व लता शिंदे. जेलुगडे : सरपंच – कृष्णा नाईक, अंकुश प्रधान, निशा गावडे, सुवर्णा गावडे, पांडुरंग गावडे, आरती गावडे, दत्तात्रय गावडे, वैशाली गावडे. लक्कीकटे : सरपंच – गीता रेडेकर, सुमिता कांबळे, सागर राजगोळकर, सुधा मुंगारे, भीमराव कांबळे, प्रियांका धुमाळे, राजाराम भिंबर.

मोटणवाडी : सरपंच – मनीषा गावडे, रोशनी गावडे, यशवंत गावडे, रेश्मा परीट, सरिता पाटील व नरसू गावडे. पार्ले : सरपंच – मोहन झेंडे, लक्ष्मण गावडे, भागूबाई गुरव, धनश्री गावडे, सागर मयेकर, सविता कांबळे, शिवाजी कांबळे, अस्मिता वंजारी. विंझणे : सरपंच – तानाजी पवार, शिवाजी पवार, दीपाली जागतकर, हरी जाधव, शामराव बागवे, लता खवरे, शोभा इंगवले, धनश्री कांबळे. तेऊरवाडी : सरपंच – मनीषा पाटील, संतराम मांग, प्रकाश दळवी, सुरेखा पाटील, गोविंद मेणसे, शोभा गुंडाजी, माया पाटील, राजेंद्र पाटील, कांचन पाटील, रेखा भिंगुर्डे. दुंडगे : सरपंच – चंद्रकांत सनदी, लक्ष्मण पाटील, सरोजिनी पाटील, वनिता पाटील, संजय खणगुतकर, यमुना पाटील, पुंडलिक सुतार, अंजना सुतार.

चायवाला आणि पाणीपुरवठा कर्मचारी झाले सरपंच

शिनोळी बुद्रुक येथे चहा विक्रेते गणपती फकीर कांबळेे विजयी झाले, तर शिरगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये प्रकाश सुतार हे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी दीपाली शिरगावकर पराभूत झाल्या.

मंत्री आले, पण उपयोग नाही झाला

विशेष म्हणजे शिनोळी बुद्रुक ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराला उत्पादन शुल्क व परिवहन मंत्री शंभुराज देसाई आले होते. मात्र, सत्ताधार्‍यांना गड राखता आला नाही. केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले. या ठिकाणी आमदार राजेश पाटील व भरमुअण्णा गटाने परिवर्तन घडवून सत्ता काबीज केली.

Back to top button