राधानगरी : 58 ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल | पुढारी

राधानगरी : 58 ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल

राशिवडे/राधानगरी : पुढारी वृत्तसेवा : राधानगरी तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल लागले असुन ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळे, अभिजित तायशेट्टे, जि. प.चे माजी उपाध्यक्ष हिंदुराव चौगले, ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष संजयसिंह पाटील, विश्वनाथ पाटील, जि. प. सदस्य पांडुरंग भांदीगरे, विनय पाटील, अविनाश पाटील तर कौलवमधील सर्वपक्षीय नेत्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या चंद्रकांत पाटील यांनी मोठा धक्का दिला आहे. कित्येक ठिकाणी सत्तेच्या विरुद्ध लोकनियुक्त सरपंच निवडून आल्याने नेत्यांची गोची आणि डोकेदुखी निर्माण झाली आहे.

विशेषत: स्थानिक आघाडीसह राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेने यश मिळविले आहे. तर संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेने खाते उघडले आहे. तर तरसंबळे येथील ‘एव्हीएम’ मशिन खुले न झाल्याने याठिकाणी फेरमतदान होण्याची शक्यता आहे.

तालुक्यातील नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच पुढीलप्रमाणे : अर्जुनवाडा : सुप्रिया सर्जेराव यादव, आकनूर : सुषमा गणेश कांबळे (राष्ट्रवादी), आटेगाव : गणपती गोविंदा वागवेकर, आमजाई व्हरवडे : अमृता बाजीराव चौगले (काँग्रेस), आवळी खुर्द : बेबीताई पांडुरंग तांबेकर (राष्ट्रवादी), आवळी बुद्रुक : अस्मिता संदीप सुतार, ओलवन : प्रतिभा ओमप्रकाश कोरगावकर, करंजफेण : जयश्री संतोष वागरे, कसबा तारळे : विमल रवींद्र पाटील (काँग्रेस), कांबळवाडी : अनिता सुरेश कुसाळे (काँग्रेस), कारिवडे : प्रवीण प्रभाकर पाटील, कासारपुतळे : सुनीता शंकर पोवार, कुंभारवाडी : रणजित विष्णू पाटील (काँग्रेस, आबिटकर गट), कुडुत्री : शिवाजी बळवंत चौगुले, केळोशी खुर्द : लता दिनकर जाधव, कोते : राजेंद्र आनंदा कोतेकर राष्ट्रवादी, खामकरवाडी : कोमल विक्रम हळदे (राष्ट्रवादी), घुडेवाडी : मनीषा संभाजी किरुळकर, चंद्रे : प्रभाकर गणपती पाटील, चांदे : प्रभावती प्रकाश रोगे (राष्ट्रवादी सत्ता कायम), चाफोडी तर्फ तारळे : भिकाजी गणपती चौगुले (राष्ट्रवादी सत्ता कायम)

ठिकपुर्ली : प्रल्हाद पाटील (55 वर्ष सत्तांतर), तळगाव : कृष्णात ज्ञानू पाटील (काँग्रेस), तिटवे : अर्चना रंगराव किल्लेदार, दुर्गमानवड : अर्चना दीपक कांबळे, धामोड – लाडवाडी : रेश्मा सदाशिव नवने, पडळी : सुरेश नारायण पाटील, पिंपळवाडी : महादेव बापू जाधव, पिरळ : अस्मिता संदीप पाटील, पुंगाव : संजीवनी बाजीराव पाटील, कासारवाडा (पाटणकर) : कोमल सर्जेराव पाडळकर, मल्लेवाडी : दिनकर दत्तात्रय खाडे, मांगोली : नेताजी कुंडलिक पाटील, माजगाव : विद्याराणी युवराज पोवार, मुसळवाडी : आशा सुनील महाडिक, मोघर्डे : बाळाबाई शंकर कांबळे, मोहडे : सुनीता आनंदराव पाटील, मजरे कासारवाडा : युवराज वारके (राष्ट्रवादी), येळवडे : ओंकार काशिनाथ पाटोळे (सत्तांतर), राशिवडे खुर्द : इंद्रजित मारुती पाटील, वाघवडे : रूपाली संतोष पाटील, शिरगाव : संदीप आनंदराव पाटील (राष्ट्रवादी), पाटणकर सावर्डे : सुमन विलास मोरे, सिरसे : निकिता प्रभाकर कांबळे, सुळंबी : सुरेखा प्रदीप गुरव, सोन्याची शिरोली : अश्विनी गुरुनाथ चौगुले (राष्ट्रवादी), हसणे : पूजा शरद पाटील, तुरंबे : दयानंद साताप्पा कांबळे (आबिटकर गट), आडोली : कमल रामचंद्र सुतार, घोटवडे : धीरज विजयसिंह डोंगळे (काँग्रेस), राशिवडे बुद्रुक : संजीवनी अशोक पाटील (काँग्रेस), बनाचीवाडी : प्राजक्ता जयवंत पताडे (स्वराज्य संघटना संभाजीराजे), कौलव : रामचंद्र सदाशिव कुंभार (चंद्रकांतदादा पाटील कौलवकर ठाकरे गट).

तालुक्यात लक्षवेधी ठरलेल्या राशिवडे बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदी काँग्रेसचे पी. डी. धुंदरे, ‘भोगावती’चे संचालक कृष्णराव पाटील गटाच्या सौ. संजीवनी अशोक पाटील विजयी झाल्या, त्यांनी राष्ट्रवादीचे अविनाश पाटील, जि. प. सदस्य विनय पाटील, काँग्रेसचे मोहन धुंदरे गटाच्या सौ. अमृता अतुल पाटील यांचा पराभव केला. राधानगरीमध्ये सर्वपक्षीय आघाडीला धक्का देत राजू भाटळे यांच्या पत्नी जि. प. सदस्या सविता भाटळे विजयी झाल्या आणि सत्तांतर घडविले. येळवडेतील ओंकार काशीनाथ पाटोळे हा तेवीस वर्षीय तरुण सरपंचपदी विराजमान झाला. तालुक्यातील सर्वात लहान सरपंच म्हणून नोंद.

नेत्यांना दिली चपराक…

कौलव ही राजकीय राजधानी मानली जाते. याठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांच्या आघाडीला धक्का देत शिवसेना उद्योगपती चंद्रकांतदादा पाटील यांनी सरपंचपदाची खुर्ची धक्कादायकपणे खेचली.

गोकुळ संचालकांना धक्का…

घोटवडेमध्ये ‘भोगावती’चे संचालक धीरज डोंगळे यांनी स्वत: सरपंचपदासाठी विजय मिळवत ‘गोकुळ’चे संचालक अरुण डोंगळेंना धक्का दिला.

स्वराज्य संघटनेेनेे खाते उघडले..

बनाचीवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी स्वराज्य संघटनेच्या प्राजक्ता जयवंत पताडे यांनी विजय मिळवत छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचे जिल्ह्यात खाते उघडले, तर राशिवडे बुद्रुक येथेही स्वराज्य संघटनेचे तीन ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले.

सरपंच राजकीय बलाबल

राष्ट्रवादी – 18, स्थानिक आघाडी – 19, काँग्रेस – 15, शिवसेना उद्धव ठाकरे – 1, भाजप – 1, आमदार आबिटकर गट, शिंदे – 2, संभाजीराजे स्वराज्य संघटना – 1.

Back to top button