कोल्‍हापूर : आळतेत मतदानाच्या आदल्‍या दिवशी ‘भानामती’चा प्रकार उघड; गुलाल, लिंबू, खोबऱ्याचीच सर्वत्र चर्चा | पुढारी

कोल्‍हापूर : आळतेत मतदानाच्या आदल्‍या दिवशी 'भानामती'चा प्रकार उघड; गुलाल, लिंबू, खोबऱ्याचीच सर्वत्र चर्चा

हातकणंगले : पुढारी वृत्‍तसेवा- आळते (ता हातकंणगले) येथे सरपंच व सतरा सदस्य पदासाठी आज (रविवार) सुरू असलेल्‍या ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान सर्व शक्तीप्रदर्शनाबरोबरचं भानामतीचा प्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे. आज सकाळी इंगवले गटाच्या कार्यालयाच्या उंबरठयावर गुलाल, लिंबू खोबरे टाकून उंबरठा पुजल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली.

आळते येथे इंगवले गटाची सत्ता आहे. सध्या होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेचे जेष्ठ नेते अरुण इंगवले यांचे चिरंजीव अजिंक्य इंगवले व शेतकरी संघटनेचे पंचायत समिती उपसभापती प्रवीण जनगोंडा यांच्यामध्ये काटयाची टक्कर होत आहे. काही अपक्ष उमेदवाराही रिंगणात आहेत.

प्रभाग क्रमाक एक मध्ये दोन्ही पॅनेलची कार्यालये आहेत. मतदानाच्या आदल्‍या दिवशी (शनिवार) रात्री इंगवले पॅनेलच्या कार्यालया बाहेर कोणी अज्ञाताने सुई, लिबू ,काळा दोरा, कापलेले लिंबू व गुलाल टाकल्याचे आज सकाळी कार्यकत्याच्या लक्षात आले. कार्यालयाच्या चौकटीचे पूजन करून तेथेच पडलेले लिबू सुई काळा दोरा कापलेले लिंबू व केस असे भानामतीचे साहित्य बाजूला करून आपल्या कामाला सुरवात केली.  मात्र २१ व्या शतकातही अंधश्रद्धेतून झालेल्‍या या प्रकाराची चर्चा परिसरात होत होती.

हेही वाचा : 

Back to top button