कोल्हापूर : नोकरीचे आमिष दाखवून 27 युवकांना 1.43 कोटींचा गंडा | पुढारी

कोल्हापूर : नोकरीचे आमिष दाखवून 27 युवकांना 1.43 कोटींचा गंडा

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  रेल्वे खात्यात, आयकर विभागात, भारतीय सैन्य दलात नोकरी लावतो, असे नोकरभरतीचे आमिष दाखवून बनावट नियुक्तिपत्रे व ओळखपत्रे देऊन 27 युवकांची एक कोटी 43 लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद आनंदा गणपती करडे (रा. ढेपणपूर गल्ली, कुरुंदवाड) याने कुरुंदवाड पोलिसात दिली आहे.

याप्रकरणी क्रांती कुमार पाटील (रा. फुलेवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर), मोहम्मद कामील अब्दुल गफार (वय 41, सध्या रा. कुर्ला मंबई, मूळ रा. प्लॉट नं. 14, नुरी मशीदजवळ जाफरनगर नागपूर), अनिस खान गुलाम रसुलखान (46, रा. 137 काटोल रोड, गोटिक खान, कटोलोड नागपूर), रुद्रप्रताप भानुप्रताप सिंग (रा. प्लॉट नं. 8, साल्ट लाखे बायपास, एलबी चौक सेक्टर 3 कोलकाता) व सुबोधकुमार (रा. पश्चिम राजबटी, मध्याग्राम दक्षिण, 24 परगना, कोलकाता) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील आनंदा करडे यांच्या एका मुलाला आयकर विभाग दिल्ली येथे तर दुसर्‍या मुलाला आर्मीत भरती करतो असे सुबोधकुमारने सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी 15 लाख रुपये घेतले. करडे व त्यांच्या सहकार्‍यांना आर्मीत 35 मुलांची बॅच पाठवायची आहे. आणखी मुले असतील तर घेऊन या, असे आमिष दाखवले. या आमिषाला रोहित कोळी (राजापूरवाडी, ता. शिरोळ), अरुण महेश खरपे (रा. कुरुंदवाड), संतोष संभाजी पाटोळे (रा. कवठेमहांकाळ, जि. सांगली), रजत बाळकृष्ण लंबे (रा. राजापूर, ता. शिरोळ), शंतनू बाळनाथ रावळ (रा. निगवे दुमाला कोल्हापूर), नितीन विलास शिंदे (रा. आष्टा, जि. सांगली), सुयोग रमेश माने (रा. सोनारवाडी, ता भुदरगड), साईनाथ पंडुरंग धोंड (रा. खालचीवाडी शेळोली, ता. भुदरगड), पवन सर्जेराव पाटील (रा. पाटेकरवाडी, ता. करवीर), सुरज पांडुरंग खडके (रा. मुगळी, ता. गडहिंग्लज), नीरज अशोक देसाई (रा. वेंगरूळ, ता. भुदरगड) रमेश पांडुरंग पोवार (रा. मुगळी, ता. गडहिंग्लज), सुनील लक्ष्मण तुरके (रा, लिंगनूर, ता. मिरज), अभिजित बाबुराव तोडकर (रा. लिंगनूर, ता. मिरज), अक्षय अशोक शिंदे (रा. नागठाणे, ता. पलूस) सुनील दादासाहेब पाटील (रा. म्हैसाळ, ता. मिरज), राजू भाऊसाहेब शिंदे (रा. तावशी, ता. अथणी), तेजस रावसाहेब पाटील (रा. खुजगाव, ता. शिराळा), किरण राजाराम जाधव (रा. वडीये, ता. कडेगाव), आकाश आनंदा करडे, अभिषेक आनंदा करडे (रा. कुरुंदवाड), अरविंद चंद्रकांत गावडे (रा. राजापूरवाडी, ता. शिरोळ), दीपक रामप्रसाद, जितेश कुमार, ब—जगोपाल, शिवाजगत नारायण (रा. छत्तरपूर दिल्ली), जयेश कांबळे (रा. मंबई), सुरज बदामे (रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ) हे युवक बळी पडले. पालकांनी सुबोधकुमार याच्या वेळोवेळी मागणीनुसार लाखो रुपये सांगितलेल्या खात्यावर जमा केले आहेत.

या युवकांना सुबोधकुमारने ट्रेनिंगसाठी कोलकाता येथील कमांडर हॉस्पिटल येथे उपस्थित करून विविध कागदपत्रकांवर सह्या घेतल्या व पोस्टाने तुम्हाला पत्र येईल, असे सांगून लावून दिले. पालकांचा सुबोधकुमार याच्याशी फोनवरून संपर्क सुरू होता. मात्र 25 जुलै 2022 पासून सुबोधकुमार व रुद्रप्रताप सिंगचा फोन बंद झाल्यानंतर हा भामटा असल्याची खात्री झाली आणि फसवणूक झाल्याचे पुढे आल्याने पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button