कोल्हापूर : राजापुरवाडी सरपंचपदी भाजपचे रावसाहेब कोळी बिनविरोध | पुढारी

कोल्हापूर : राजापुरवाडी सरपंचपदी भाजपचे रावसाहेब कोळी बिनविरोध

शिरोळ; पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी (दि.५) रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रकिया पार पडली. यावेळी राजापुरवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनुसूचीत जमाती प्रवर्गातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रावसाहेब रामु कोळी यांचा एकमेव अर्ज राहिला. यामुळे सरपंचपदी कोळी यांची बिनविरोध निवड झाली. जिल्ह्यात बिनविरोध सरपंच निवडीचे पहिले खाते भाजपने शिरोळ तालुक्यात उघडले आहे.

राजापूरवाडी ग्रामपंचायत सदस्यपदी अभिजीत रामचंद्र कोळी यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर ग्रामस्थांनी व तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी व गुलालची उधळण करून जल्लोष केला.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव, कोळी महासंघाचे तालुकाध्यक्ष विजय आरगे, भाजपा नेते पोपट पुजारी, गजानन संकपाळ, नगरसेवक पंडित काळे, इमरान आत्तार, रवी शहापुरे, शिवाजी खोंद्रे, भगवान कोळी, अन्वर जमादार, दीपक पाटील, युनूस नदाफ, उल्हास उत्तम पाटील, विवेक फल्ले, योगेश सारस्वत, संतोष जाधव, ॲड. राहुल कट्टी यासह भाजपा समर्थक व राजापूरवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button