कोल्हापूर : पोलिस भरतीत जिल्ह्याला केवळ 24 जागा; तरुणांमधून नाराजी | पुढारी

कोल्हापूर : पोलिस भरतीत जिल्ह्याला केवळ 24 जागा; तरुणांमधून नाराजी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राज्यात पोलिस भरती जाहीर झाली असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यासाठी केवळ 24 पोलिस शिपाई पदांची भरती होणार आहे. केवळ 24 जागा भरणार असल्याने तरुणांमधून नाराजी दिसून येत आहे.

पोलिस भरतीसाठी हजारो तरुण दररोज सराव करतात. जिल्ह्यातील करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, गडहिंग्लज भागातील तरुणांचा पोलिस भरतीकडे मोठा ओढा आहे. सध्या अनेक अ‍ॅकॅडमी कार्यरत असून तेथे अशा उमद्या तरुणांचा मोठा भरणा दिसून येतो. शारीरिक चाचणीसोबतच 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी बोलावले जाते. यामध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, मराठी व्याकरण यांचा अभ्यास येतो. याचीही तयारी जोरात सुरू आहे.

जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या भरतीमध्येही 68 जागा भरण्यात आल्या होत्या. कोरोनामुळेही भरती प्रक्रिया लांबली होती. नव्याने जाहीर झालेल्या भरतीच्या जाहिरातीमध्ये कोल्हापूरसाठी केवळ 24 जागा भरण्यात येणार असल्याचे दिसते. सध्या ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी कमी पदांमुळे भरतीची तयारी करणार्‍या तरुणांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

Back to top button