

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. पुढारी कस्तुरी क्लबमार्फत आज, दि. 30 नोव्हेंबर रोजी दु. 3 वाजता राजारामपुरी कोल्हापूर येथील डॉ. व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉल येथे 'जय जय महाराष्ट्र माझा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातील विविध लोकसंस्कृतीचे नृत्य संगीतमय सादरीकरण होणार आहे. भूपाळी, भारुड, पोवाडा, गोंधळ, ठाकरी नृत्य, धनगरी नृत्य इ.सह इतर अनेक विलोभनीय नृत्याविष्कार कस्तुरी क्लब सभासदांना अनुभवण्यास मिळणार आहे. दरम्यान, कस्तुरी क्लबची सभासद नोंदणी अंतिम टप्प्यात आली असून कार्यक्रमस्थळी दु. 2 पासून सभासद नोंदणी सुरू राहणार आहे.
सभासद होताच बॉस मल्टियुजर थर्मास हे हमखास गिफ्ट व विविध मोफत सेवा व वस्तू कुपन्स सभासदांना दिले जाणार आहेत. नोंदणी शुल्क 600 रु. असून सभासद होऊन अशाच अनेक रंगारंग कार्यक्रमाचा महिलांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.
अधिक माहिती व सभासद नोंदणी संपर्क 8805007724. कार्यक्रम वेळेत सुरू होईल. कस्तुरी क्लब ओळखपत्र आवश्यक आहे.