कोल्हापूर : कॅमेरा हँडलिंग वर्कशॉपला विद्यापीठात उत्स्फूर्त प्रतिसाद | पुढारी

कोल्हापूर : कॅमेरा हँडलिंग वर्कशॉपला विद्यापीठात उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनतर्फे घेण्यात आलेल्या कॅमेरा हँडलिंग वर्कशॉपला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बी न्यूजचे वरिष्ठ कॅमेरामन प्रशांत आयरेकर व ‘पुढारी’ डिजिटलचे रवींद्र बागल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शटर स्पीड, अँपर्चर, आयएसओ आदीसंदर्भात प्राथमिक माहिती दिली. कॅमेरा अँगल, झूम इन, झूम आऊटबद्दल सांगितले. व्हिडिओग्राफी, व्हिडिओ अँगल, बॉडी लँग्वेज याबाबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना काही टिप्स दिल्या.

विद्यार्थ्यांनी सुरुवातीला अध्यासनाच्या बाहेर फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी केली. त्यानंतर मार्गदर्शकासह विद्यार्थ्यांनी नॅनो टेक्नॉलॉजी, विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालगत फोटोग्राफीचे प्रात्यक्षिक केले. यावेळी काही विद्यार्थ्यांनी व्हिडिओग्राफी करून तज्ज्ञांच्या मदतीने प्रात्यक्षिक केले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत केले.

यावेळी पत्रकारिता विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. रत्नाकर पंडित, सहयोगी शिक्षक डॉ. आलोक जत्राटकर, मोहसिन मुल्ला, मतीन शेख, अक्षय दळवी, चेतन गळगे आदी उपस्थित होते.

Back to top button