रिक्षा, यंत्रमाग कामगारांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ – कामगारमंत्री सुरेश खाडे | पुढारी

रिक्षा, यंत्रमाग कामगारांसाठी लवकरच कल्याणकारी मंडळ - कामगारमंत्री सुरेश खाडे

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा
वस्त्रोद्योगातील महत्त्वाचा घटक असलेल्या यंत्रमाग कामगारांसाठी तसेच रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत लवकरच निर्णय घेऊन ते सुरू करू, अशी ग्वाही कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी दिल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापण्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांत प्रवासी वाहतूक करण्यासाठी पूर्ववत परवाना मिळावा, नवीन रिक्षा घेण्यासाठी शासनाकडून रिक्षाच्या एकूण किमतीच्या 25 टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळावी, केएटीपी पार्क येथील पासिंग ब—ेक टेस्ट ट्रॅक लवकरात लवकर सुरू करावा आदी मागण्याही करण्यात आल्याचे आवाडे म्हणाले. यंत्रमाग कामगारांच्या कल्याणकारी मंडळाचे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, रामचंद्र जाधव, मन्सूर सावनूरकर, जीवन कोळी, शिवाजी साळुंखे, खाजाहुसेन मुजावर, आनंदा गजरे, विनोद बुकशेट, उत्तम येटाळे, अल्ताफ शेख आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

Back to top button