कस्तुरीच्या कार्यक्रमात अवतरणार अवघा महाराष्ट्र | पुढारी

कस्तुरीच्या कार्यक्रमात अवतरणार अवघा महाराष्ट्र

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राच्या संस्कृतीशी समरस झालेल्या लोककला, लोकगीते, नृत्य यांचा आविष्कार दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब आयोजित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमात अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमातून संस्कृती, परंपरा आणि समृद्ध वारसा अशा सांस्कृतिक वैभवाचे दर्शन कस्तुरींना घडणार आहे. राजारामपुरी येथील डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह येथे बुधवार, दि. 30 रोजी दुपारी 3 वाजता हा मराठमोळा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

महाराष्ट्राची संस्कृती लोप पावू नये, त्या संस्कृतीला उजाळा मिळावा तसेच कलागुणांना वाव मिळावा यासाठी कार्यक्रम घेण्यात येत आहे. यामध्ये गणेश वंदना, गवळण, भूपाळी, ओवी, धनगरी गीत, कोळीगीत, लोकगीत, गोंधळ, भारुड, पोवाडा, मुरळी, वारकरी, मंगळागौर, पोतराज आणि कडकलक्ष्मी, पिंगळा, जागर, भैरवी अशी लोकसंगीतातील अस्सल सुश्राव्य गीते व नृत्य प्रकार याची मेजवानी महिलांना मिळणार आहे.

कस्तुरी क्लबमार्फत नेहमीच महिलांसाठी विविधांगी कार्यक्रमांची मेजवानी दिली जाते. झिम्मा-फुगडी, दांडिया, लावणी अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमांसह त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासंदर्भात सेल्फ ग्रुमिंग यांसारख्या कार्यक्रमाचा महिला सभासदांनी आस्वाद घेतला आहे. यापुढे अशाच रंगारंग कार्यक्रमांची रेलचेल कस्तुरी क्लबकडून महिलांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी क्लबचे सभासद असणे आवश्यक आहे. नोंदणी अंतिम टप्प्यात असून सभासद होण्याची ही महिलांना अंतिम संधी असणार आहे. त्यामुळे आजच कस्तुरीचे सभासद व्हा.

खास महिलांच्या आग्रहाखातर नोंदणीसाठी मुदतवाढ

दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबची सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. कस्तुरी क्लबचे सभासद होण्यासाठी आता अंतिम संधी असून लवकरच सभासद नोंदणी करून अनेक दर्जेदार मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. तसेच सभासद होताच महिलांना बॉस कंपनीचा स्टेनलेस स्टील कॉपर कोटिंगचा थर्मास देण्यात येणार आहे. याशिवायही अनेक लकी ड्रॉ व डिस्काऊंट कूपनचा खजिना सभासदांसाठी उपलब्ध असणार आहे. टोमॅटो एफएम कार्यालय, बागल चौक येथे नोंदणी सुरू असून अधिक माहितीसाठी 8805007724 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा .

Back to top button