कोल्हापूर : फुटबॉल फिव्हर; हंगाम गाजविण्यासाठी संघ सज्ज | पुढारी

कोल्हापूर : फुटबॉल फिव्हर; हंगाम गाजविण्यासाठी संघ सज्ज

कोल्हापूर; सागर यादव : कोरोना कालावधीतील दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा कोल्हापुरात फुटबॉल हंगामाचे बिगुल वाजले आहे. वरिष्ठ गटातील फुटबॉल संघ व खेळाडू नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 16 संघ आगामी फुटबाल हंगाम गाजविण्यासाठी सज्ज झाले आहेत. दरम्यान, 20 नोव्हेंबरपासून किक ऑफ होणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा फिव्हर जगभर पसरला आहे. याला फुटबॉल पंढरी कोल्हापूरही अपवाद नाही. विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आणि स्थानिक फुटबॉल हंगामाच्या पार्श्वभूमीवर अवघे कोल्हापूर शहर फुटबॉलमय बनले आहे. फुटबॉलप्रेमींच्या मनावर राज्य करणार्‍या नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडूंची भव्य कटआऊटस् चौकाचौकांत उभारण्यात आली आहेत. तसेच गल्ली-बोळात विविध देशांचे ध्वज, पताका लावण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशन (केएसए) च्या वतीने छत्रपती शाहू स्टेडियमवर हंगामासाठीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, जगभरातील फुटबॉलप्रेमींना प्रतीक्षा असणार्‍या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचेही वेळापत्रक जाहीर झाल्याने सर्वत्र फुटबॉलमय वातावरण निर्माण झाले आहे. यंदाच्या फुटबॉल हंगामात खेळणार्‍या आंतरराष्ट्रीय खेळाडूंप्रमाणे स्थानिक संघांनीही आपल्या फुटबॉल किटस्ची तयारी सुरू केली आहे. खेळाडूंच्या हेअर स्टाईलनुसार फुटबॉलप्रेमीही केस कापत आहेत. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामही फुटबॉलमय बनले आहे.

पाटाकडील तालीम

ऋषीकेश मेथे-पाटील, प्रतीक बदामे, ओंकार पाटील, ओंकार जाधव, कैलास पाटील, अक्षय पायमल, यश देवणे, सैफ हकीम, यश एरंडोले, रोहित पोवार, अक्षय मेथे-पाटील, शोएब बागवान, प्रथमेश हेरेकर, रोहित देसाई, वृषभ ढेरे, ओंकार मोरे, शाहिद महालकर, प्रेम देसाई, मोहंमद खान, अ‍ॅड्र्यू ओगोचे, व्हिक्टर जॅक्सन, अजिंक्य नलवडे. प्रशिक्षक शरद माळी.

दिलबहार तालीम मंडळ

चेतन अपराध, पवन माळी, रोहन दाभोळकर, मोहम्मद खुर्शीद, सनी सणगर, मोहसीन बागवान, सुशांत अतिग्रे, अक्षय दळवी, सतेज साळोखे, सचिन पाटील, राहुल तळेकर, तुषार पुनाळकर, अनिकेत जाधव, निखिल खाडे, शुभम घराळे, स्वयम साळोखे, सुमित घाटगे, जावेद जमादार, शुभम माळी, इमॅन्युअल इचिबेरी, संडे ओबेम, प्रमोदकुमार पांडे. प्रशिक्षक धनंजय सूर्यवंशी.

शिवाजी तरुण मंडळ

करण चव्हाण, रोहित जाधव, शरद मेढे, मयुरेश चौगुले, संकेत साळोखे, विक्रम शिंदे, सुयश हंडे, साहिल निंबाळकर, शुभम साळोखे, विशाल पाटील, ऋतुराज सूर्यवंशी, सुमित जाधव, सिद्धेश साळोखे, जय कामत, संदेश कासकार, योगेश कदम, रोहन आडनाईक, इंद्रजित चौगुले, अदित्य लायकर, किमरान फर्नांडिस, करीम मुरेन, कोफी डेमॉस. प्रशिक्षक संतोष पोवार.

खंडोबा तालीम

दिग्विजय आसनेकर, रणवीर जाधव, प्रथमेश गावडे, आशिष चव्हाण, ऋतुराज संकपाळ, अजीज मोमीन, निखिल खन्ना, संकेत मेढे, आकाश मेस्त्री, श्रीधर परब, हर्षद शिंदे, प्रभू पोवार, कुणाल दळवी, सागर पोवार, ओंकार लायकर, विकी सुतार, सिद्धार्थ शिंदे, अबूबखर अल हसन, मायकल सेफह, किरण चोकसी, पृथ्वीराज साळोखे, अनिरुद्ध निकम. प्रशिक्षक राहुल पाटील.

बीजीएम स्पोर्टस्

अभिजित साळोखे, केवल कांबळे, निखिल कांबळे, साहिल खोत, प्रथमेश पाटील, जीवन लुड्रिक, अभिषेक सावंत, रोहन कांबळे, प्रमोद राऊत, अनिकेत पोवार, कपिल शिंदे, वैभव राऊत, संकेत जरग, अमृत हंडे, प्रणव निकम, सुजल सुतार, महेश जामदार, हमीद बालोगुन, डेव्हिड ओपारा, फ्रान्सिस जीमिसन, अदित्य भोसले, सुयश गायकवाड. प्रशिक्षक नागेश राजमाने.

बालगोपाल तालीम

रोहित कुरणे, अभिनव साळोखे, अनिकेत तोरसकर, ओंकार खोत, साहिल डाकवे, दिग्विजय वाडेकर, अक्षय कुरणे, शुभम जाधव, अक्षय सरनाईक, प्रसाद सरनाईक, आशिष कुरणे, सचिन बारामते, सुरज कांदळकर, सुरज जाधव, प्रतीक पोवार, ऋतुराज पाटील, कृणाल नाईक, केल्व्हिन मोमोव्ह, व्हिक्टर निक्वे, परमजित बाघेल, ऋषिकेश डवरी, ओंकार गुरव. प्रशिक्षक सूर्यकांत पाटील.

प्रॅक्टिस क्लब

रोहित भोसले, रजत जाधव, शिवम पोवार, अर्जुन साळोखे, अजिंक्य मेढे, अक्षय मोळे, प्रणव फडतारे, संकेत जाधव, सागर चिले, राहुल पाटील, सुमित कदम, सचिन गायकवाड, ओंकार जाधव, सागर पोवार, अदित्य पाटील, अनिरुद्ध जाधव, ओम पोवार, प्रणव कणसे, जुलेस थ्रो, चिमा इफॅनीचिक्यू, अमित बिस्वास, अथर्व रायकर. प्रशिक्षक रवींद्र शेळके.

संयुक्त जुना बुधवार

प्रकाश संकपाळ, हरिष पाटील, रमाकांत लोखंडे, रविराज भोसले, अभिषेक घुले, सचिन मोरे, अभिषेक भोपळे, सुशीलकुमार पाटील, सुशील सावंत, आकाश मोरे, अभिषेक देसाई, निलेश सावेकर, पृथ्वीराज कदम, अनिकेत जोशी, स्वप्नील तेलवेकर, महेश जगताप, अनिकेत कुंभार, आशिष गवळी, रिचमंड आविटी, डॉमिनीक्यू डाडे, अब्दुल्ला अन्सारी, सोहम साळोखे. प्रशिक्षक सोमनाथ वाघमारे.

फुलेवाडी क्रीडा मंडळ :

सिद्धेश यादव, तेजस जाधव, अरबाज पेंढारी, साहिल पेंढारी, संदीप पोवार, रोहित मंडलिक, अक्षय मंडलिक, मंगेश दिवसे, जिगर राठोड, चंदन गवळी, विराज साळोखे, भरत पाटील, अजय जाधव, रणवीर खालकर, माणिक पाटील, प्रतीक सावंत, प्रथमेश कांबळे, आदित्य रोटे, विराज पोवार, व्यारनी कोलोंड, स्टेन्ली इझे, किव्ही झिमोमी. प्रशिक्षक अजय वाडेकर.

कोल्हापूर पोलिस :

महेश पाटील, प्रदीप भोसले, अफताब मुल्ला, महेश पोवार, शुभम संकपाळ, रामचंद्र माळी, सोमनाथ लांबोरे, अल्फाज हकीम, रोहित ठोंबरे, अजित पोवार, अमर आडसुळे, युक्ती ठोंबरे, विशाल चौगुले, प्रथमेश साळोखे, शकिल पटेल, कुणाल माने, संस्कार पाटील, सुशाम पाटील, सागर भोसले. प्रशिक्षक दिग्विजय मळगे.

ऋणमुक्तेश्वर तालीम :

युनुस पठाण, आयुष चौगुले, सूरज भोसले, तन्मय खराडे, सोमेश पाडळकर, सिद्धेश पाडळकर, ऋषीकेश पुरेकर, सूरज पाटील, अनिकेत कोल्हे, विकी जाधव, सिद्धेश मोगाणे, प्रथम भोसले, अथर्व मोरे, ओम घाटगे, पवन कांगोरे, अमित सावंत, देवराज जाधव, सिद्धेश धुमाळ, फ्रँकी डेव्हिड, प्रसाद भालकर, सुमित भंडारी. प्रशिक्षक सुरेश चव्हाण.

झुंजार क्लब :

करणसिंह पाटील, समर्थ नावले, ओंकार भोजे, सूर्यप्रकाश सासने, मसुद मुल्ला, राजेश बोडेकर, संदीप जानकर, सुयश साळोखे, शाहू भोईटे, आकाश बावकर, अवधूत पाटोळे, यशराज नलवडे, प्रथमेश बाटे, अनिल जानकर, कुणाल चव्हाण, चेतन साळोखे, विशाल सासने, थॉमस गोमेज, कार्लोस नाला, निवृत्ती पावनोजे, दत्तात्रय शेवाळे, युवराज पाटोळे. प्रशिक्षक सुरेश भोईटे.

सम्राटनगर स्पोर्टस् :

नीलेश गायकवाड, अभिराज काटकर, निरंजन कमते, अक्षय सावंत, नीलेश खापरे, धीरज क्षीरसागर, आदर्श पोवार, संदीप आडनाईक, ओंकार चौगुले, आकाश काटे, कार्तिक जाधव, शुभम दरवान, प्रशांत बामणे, ऋषीकेश दाभोळे, यासीन नदाफ, प्रशांत गवळी, अक्षय वडर, तरुण कुमार, अ‍ॅडे स्टिफन, किलने डिमांडे, राजदीप गुरव, प्रणव रणनवरे. प्रशिक्षक मृदूल शिंदे.

उत्तरेश्वर तालीम :

ऋषीकेश पाडळकर, अमित सुतार, मयूर कदम, स्वराज पाटील, सिद्धेश वीर, सिध्दार्थ पाटील, विश्वदीप भोसले, अक्षय शिंदे, इंद्रजित शिंदे, सत्यजीत पाटील, प्रतिक कांबळे, यश चव्हाण, कनैय्या निगवेकर, शहारुख हेर्लेकर, अदित्य साळोखे, श्रीकांत माने, अजिंक्य कदम, ओंकार केर्लेकर, निखील साळोखे, सोहेल शेख, ऑल्यमिडे ओल्वोलाग्बा, कोनान कोफी. प्रशिक्षक अमित शिंत्रे.

रंकाळा तालीम :

निखिल बचाटे, रोहित सुतार, देवराज मंडलिक, शुभंकर गोसावी, शिवम पोवार, अविष्कार राऊत, अमन सय्यद, प्रफुल्ल मस्कर, अमित जाधव, निखील पोवार, प्रतिक बेडेकर, हर्ष जरग, अनिकेत जाधव, रोहित दिंडे, मोहंमद महात, अमित पोवार, पृथ्वीराज पाटील, विकास जाधव, निनाद चव्हाण, विकी गौतम, निरज भोसले. प्रशिक्षक अनिकेत देसाई.

संध्यामठ मंडळ :

संदेश शिंदे, सौरभ हारुगले, किरण कावणेकर, ऋषिकेश तांबे, तेजस जाधव, आशिष पाटील, अमोल पाटील, ऋषिकेश सडोलीकर, विनायक शिंदे, स्वराज सरनाईक, अजिंक्य सरनाईक, सिद्धेश साठे, अवधूत तिवरे, यश जांभळे, साहिल साळोखे, ओंकार पाटील, अवधूत शिंदे, विशाल मस्वेकर, इम्रान बाणदार, लखीनदोन जहरी, कादिर तडवी, बिकी भौमिक. प्रशिक्षक निखिल सावंत.

Back to top button