सर्व्हर डाऊनच्या त्रासामुळे क्रीडा स्पर्धांची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने

सर्व्हर डाऊन
सर्व्हर डाऊन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हर डाऊनच्या त्रासामुळे आगामी मनपा व तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील दहा खेळांच्या क्रीडा स्पर्धांची नोंदणी ऑफलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. या संदर्भात जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेने बुधवारी जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांची भेट घेऊन येणाऱ्या अडचणी मांडल्या.

गेले दोन वर्षे कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा झाल्या नव्हत्या. यावर्षीही शालेय क्रीडा स्पर्धाी दुसऱ्या सत्रात सुरू झाल्या आहेत. सर्व स्पर्धा एकत्रितपणे एकाच आठवड्यात करण्यात आले. घेण्यात येत आहेत. खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जिल्ह्यातील सर्व शाळेतील शिक्षकांनी स्पर्धेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केल्याने सातत्याने सर्व्हर डाऊनचा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने क्रीडा शिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची भेट घेतली.

बैठकीत तालुका स्पर्धा घेण्यासाठी पंच समिती, डॉक्टर, पोलिस, पंच यासह विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठीचे परिवहन मंडळास पत्र जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत देण्याचे यावेळी मान्य यामुळे बैठकीस कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य आर. डी. पाटील, सचिव संदीप पाथरे, महेश सूर्यवंशी, संताजी भोसले, शरद तावदारे, सुधाकर डोणोलीकर, प्रा. संभाजी पाटील, उदय पाटील, योगेश मांगुरे-पाटील, आर. बी. पाटील यांच्यासह क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news