कोल्हापूर : जठारवाडीत गॅस्ट्रो सदृश्य आजाराची लागण; ३२ रुग्णांवर उपचार सुरु | पुढारी

कोल्हापूर : जठारवाडीत गॅस्ट्रो सदृश्य आजाराची लागण; ३२ रुग्णांवर उपचार सुरु

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा : गॅस्ट्रो सदृश्य आजाराची जठारवाडी (ता. करवीर) येथील सुमारे 32 जणांना लागण झाली आहे. कोल्हापूर येथील सेवा रुग्णालयामध्ये पंधरा जण, भुये प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच गावातील खाजगी दवाखान्यात या रुग्णांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या घटनेने जिल्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून सकाळपासून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यापासून सर्वजण जठारवाडीत ठाण मांडून बसले आहेत.

या आजाराचे नेमके कारण समजून येत नसले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने गावात व परिसरात एकच खळबळ माजली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक बाधीत झाल्यामुळे पाण्यातून विष बाधा झाली का ? हे पाहण्यासाठी याबाबतचे पाण्याचे नमुने तपासासाठी देण्यात आले आहेत. एवढ्या प्रमाणात गॅस्ट्रो सदृश्य आजाराने 32 जणांना बाधा झाल्याने पुन्हा एकदा मोठे संकट गावासमोर उभे राहिले आहे.

Back to top button