कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण; संशयिताला सांगलीत अटक | पुढारी

कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचे अपहरण; संशयिताला सांगलीत अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी राजेंद्रनगर येथील अमन शंकर हकीम (वय 21) यास रविवारी अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद पीडित मुलीच्या पालकांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल केली होती. चौकशीअंती हकीमने मुलीचे अपहरण केल्याचे निष्पन्न झाले होते.

स्थानिक गुन्हे अन्वेषणसह राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पथक संशयिताचा शोध घेत होते. मुलीसह संशयिताचा सांगलीत वावर असल्याचा सुगावा लागला. पथकाने मुलीची सुटका करून अमन हकीमला ताब्यात घेतले. संशयितावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.

Back to top button