कोल्हापूर : शिरोळ येथे ऊस वाहतूक रोखल्याने जोरदार हाणामारी | पुढारी

कोल्हापूर : शिरोळ येथे ऊस वाहतूक रोखल्याने जोरदार हाणामारी

शिरोळ : पुढारी वृत्तसेवा : ऊस दराच्या पार्श्वभूमीवर आंदोलन अंकुश व कारखानदार समर्थक यांच्यात शिरटी फाट्यावर ऊस वाहतूक अडवून धरण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी झाली. आज (दि. ६) सकाळपासून आंदोलन अंकुशमार्फत शिरटी फाट्यावर कारखान्याकडे जाणारी उसाची वाहने रोखून धरण्यात येत आहेत.

दरम्यान, कारखाना समर्थक आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी वाहन पुढे सोडण्याचा प्रयत्न झाल्यानंतर वाहन पुढे न सोडण्यासाठी आंदोलकांनी ट्रॅक्टरसमोर आडवे पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाहने तशीच पुढे नेण्यात आली. यावेळी आंदोलनाची व्याप्ती वाढत जाऊन आंदोलक व समर्थक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यामुळे शिरटी फाटा येथे तणावपूर्ण वातावरण बनले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button