हळदवडे-करंजिवणे येथे डेंगूसदृश्य रुग्णसंख्येत वाढ ! | पुढारी

हळदवडे-करंजिवणे येथे डेंगूसदृश्य रुग्णसंख्येत वाढ !

मुदाळतिट्टा, पुढारी वृत्तसेवा : हळदवडे- करंजीवणे येथे गेल्या महिन्याभरापासून डेंगू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच डेंग्यू चा एक रुग्ण दगावल्याने आमदार हसन मुश्रीफ यांनी बुधवारी (दि.२) गावात भेट देऊन आरोग्याबाबत माहिती घेतली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन त्यांना कडक सूचनाही दिल्या.

हळदवडे येथील सरपंच उत्तम सुतार यांचे चिरंजीव सौरभ सुतार याचे डेंग्यू मुळे निधन झाले. त्यांच्या घरी जाऊन आमदार मुश्रीफ यांनी सांत्वन केले. त्यानंतर हळदवडे ग्रामदैवत सभागृहात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांची बैठक घेतली. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन डेंगू बाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.

हळदवडे येथील सौरभ सुतार याचा डेंगूने मृत्यू झाल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण तयार निर्माण आहे. पण येथील ग्रामसेवक गांभीर्याने घेत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तर आरोग्य विभागाकडूनही ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देता आली नाहीत. आमदार हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणाची माहिती घेत सर्वांनाच सूचना देत दक्षता घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे सांगितले.

या बैठकीला दिग्विजय पाटील,शिल्पा खोत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर साळे ,गटविकास अधिकारी सुशील कुमार संसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अभिजीत शिंदे, नारायण भराडे ,बाळासो भराडे, संजय फराकटे, रंगराव भराडे, संजय आंग्रे, उत्तम टेंभुगुडे, संभाजी अस्वले, सातापा काशीद, अंकुश गुरव, अमोल पाटील, बी.पी. मांगोरे विवेक ढोले ग्रामसेविका सुषमा कुरुळपे आदी उपस्थित होते.

हेही वाचलंत का?

Back to top button