

धामोड, पुढारी वृत्तसेवा : धामोड येथील नऊ नंबर वसाहत येथे गळ्यातील स्कार्प गिरणीच्या पट्टयात अडकुन मंगल मल्लाप्पा शिंदे (वय ४०) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मंगल शिंदे यांचा घरी दळप कांडप गिरणीचा व्यवसाय आहे . गिरण चालु असताना नाका तोंडात पिठ जाऊ नये यासाठी वापरतेला स्कार्फ त्यांनी गळ्या भोवती गुंडाळला होता. पिठाची मात्रा बघताना नकळत गिरणीच्या पट्ट्यामध्ये स्कार्फ अडकला व गळ्याभोवती फास आवळला. यामूळे त्याचा जागीच मृत्यु झाला.
याबाबतची नोंद सी.पी.आर. पोलीास चौकी येथे करण्यात आली आहे. त्यांचा निधनामूळे परिसरात हळहळ व्यक्त केली. त्यांच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी आहे.
हेही वाचा