शिंदे-फडणवीस सरकारच थेट पाईपलाईन योजना पूर्ण करेल : चंद्रकांत पाटील | पुढारी

शिंदे-फडणवीस सरकारच थेट पाईपलाईन योजना पूर्ण करेल : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : शिंदे-फडणवीस सरकार सामान्य जनतेचे व संवेदनशील असल्यामुळे कोल्हापूरची थेट पाईपलाईन योजना हे सरकारच पूर्ण करेल, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

महाविकास आघाडी सरकारने केवळ घोषणा करून फक्त वेळकाढूपणा केला. मात्र विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारकडून जनहिताचा आणि संवेदनशील कारभार होत असल्याचा दावा पाटील यांनी केला.

भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या थकबाकीदार 63 हजार शेतकर्‍यांच्या सातबारावरील कर्जाचा बोजा कमी करून कर्मचार्‍यांचा थकीत पगार आणि इतर देणी दिली जातील, असे सांगून पाटील म्हणाले की, कोल्हापुरात लवकरच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू होणार आहे. अभियांत्रिकी शिक्षण मराठी भाषेत होणार असून, 31 डिसेंबरपर्यंत सर्व पुस्तके मराठी भाषेत येतील.

Back to top button