वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या अभिज्ञाला रौप्य | पुढारी

वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये कोल्हापूरच्या अभिज्ञाला रौप्य

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : इजिप्तपमधील कैरो येथे सुरू असलेल्या वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पेठवडगाव (ता. हातकणंगले) येथील आंतरराष्ट्रीय नेमबाज अभिज्ञा पाटीलने सांघिक प्रकारात रौप्यपदक पटकावले.

अभिज्ञा पाटीलने मनू भाकर (हरियाणा) आणि रिदम सागवान (हरियाणा) यांच्यासमवेत महिला गटातील 25 मीटर स्पोर्टस् पिस्टल प्रकारात 450 पैकी 443 गुणांची कमाई करत रौप्यपदकावर नाव कोरले.

सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत चेन यान, लियू रुई आणि झाओ जैरूजुआन यांचा समावेश असलेल्या चीनच्या संघाने अभिज्ञा, भाकर व सांगवान यांचा पराभव केला. भारतीय चमूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, वर्ल्ड चॅम्पियनशिप मधले हे अभिज्ञाचे हे दुसरे पदक आहे. 2018 साली झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अभिज्ञाने कांस्यपदकाला गवसणी घातली होती.

Back to top button