जयसिंगपूर : शिरोळ तालुक्‍यात ढगफुटी; सांगली-कोल्‍हापूर बायपास महामार्ग पाण्याखाली | पुढारी

जयसिंगपूर : शिरोळ तालुक्‍यात ढगफुटी; सांगली-कोल्‍हापूर बायपास महामार्ग पाण्याखाली

जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : शिरोळ तालुक्‍यात ढगफुटी झाली असून यामुळे सांगली-कोल्‍हापूर बायपास महामार्ग पाण्याखाली गेला आहे. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस ढगफुटी झाल्याप्रमाणे तब्बल दीड तास विजेच्या कडकडाटासह बरसत होता. या मुसळधार पावसाने शिरोळ तालुक्यात एकच दैना उडाली. उदगाव (ता. शिरोळ) येथे सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर ओढ्याचे पाणी आल्याने महामार्ग बाहतुकीसाठी बंद झाला आहे.

त्याचबरोबर उदगाव-रेल्वे स्टेशन चिंचवड-शिरोळ, उदगाव-उमळवाड यासह तालुक्यातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर जयसिंगपूर शहरात अनेक दुकाने, घरात पाणी आल्याने खळबळ उडाली आहे. दीड तासांत 118 मिलिमीटर पाऊस पडल्याने शिरोळ, जयसिंगपूर, उदगाव, चिंचवड यासह परिसरातील शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

जयसिंगपूर येथे अनेक इलेक्ट्रिक दुकाने, शोरूम्‍स, घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक रस्त्यांवर पाणी आल्याने ऐन दिवाळीत नागरिकांची दैना उडाली आहे. मध्यरात्री शिरोळ तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने शेतकरी देखील अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button