भारतात व परदेशात ‘एमबीबीएस’ प्रवेश संधी; दै. ‘पुढारी’ आणि अस्ट्युट अ‍ॅकॅडमीतर्फे मोफत सेमिनार | पुढारी

भारतात व परदेशात ‘एमबीबीएस’ प्रवेश संधी; दै. ‘पुढारी’ आणि अस्ट्युट अ‍ॅकॅडमीतर्फे मोफत सेमिनार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय विद्या शाखेतून पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेण्याची स्पर्धा वाढली असून, भारतासह परदेशात वैद्यकीय शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दै. ‘पुढारी’ आणि अस्ट्युट अ‍ॅकॅडमी यांच्या वतीने भारत व परदेशात एमबीबीएस प्रवेशासंदर्भात मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. भारतात व परदेशात एमबीबीएस प्रवेश विनाडोनेशन, विनामॅनेजमेंट कोटा, मेरिटवरील प्रवेश, याबाबत सेमिनारमध्ये अस्ट्युट अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. तुषार देवरस हे ९ वी ते १२ वीमधील विद्यार्थी, पालकांना मार्गदर्शन करणार आहेत.

हे मोफत सेमिनार गुरुवार (दि. २०) डॉ. व्ही. टी. पाटील हॉल, ताराराणी विद्यापीठ येथे सायंकाळी ७ वाजता आयोजित केले आहे. वैद्यकीय क्षेत्रात दिवसेंदिवस नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, हे प्रगत शिक्षण भारतासह परदेशात उपलब्ध आहे. यामुळे गेल्या काही वर्षांत वैद्यकीय शिक्षण घेण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. देशासह परदेशातून वैद्यकीय शिक्षण घेण्याची कवाडे विद्यार्थ्यांसाठी खुली झाल्याने विद्यार्थ्यांचा या शिक्षण प्रणालीकडे ओघ वाढला आहे. एमबीबीएस होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसह तेथील रहिवास, सुरक्षितता आणि करिअरच्या संधी, याची सखोल माहिती सेमिनारमध्ये देण्यात येणार आहे.

या बाबींचा समावेश कार्यक्रमात असणार आहे. या अनुषंगाने हा सेमिनार विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. सर्वसमावेशक माहिती या सेमिनारमधून मिळू शकणार असल्याने अवश्य सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. २१) हॉटेल सयाजी, कावळा नाका येथे सकाळी ८ ते सायंकाळी ६ च्या दरम्यान डॉ. तुषार देवरस विद्यार्थ्यांना मोफत कौन्सलिंग करणार आहेत.

कार्यक्रमात सहभागासाठी http://kolhapur. AstuteAcademy.com या लिंकवर जाऊन नोंदणी करता येणार आहे. तसेच सत्राच्या 15 मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर जागा दिली जाईल.

सेमिनारमध्ये काय?

  • भारत सरकार, खासगी आणि डिम्ड विद्यापीठ प्रवेश प्रक्रिया
  • २००+ च्या नीट गुणांसह मेरिटवर प्रवेश कसा मिळवायचा
  • एमबीबीएस प्रवेशावर नवीन शैक्षणिक धोरण २०२० चा परिणाम
  • मेडिकलसाठी सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय पर्याय
  • नॅशनल मेडिकल कमिशन गॅझेट अधिसूचना विश्लेषण

Back to top button